मुंबई : इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अनेक भूमिकांना न्याय दिला पण एका खास भूमिकेने त्यांना यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवलं. अभिनेते शिवाजी साटम यांच्यासोबत देखील असं झालं. साटम यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यांना लोकप्रियता मिळाली, ती म्हणजे सीआयडी मालिकेच्या माध्यमातून. त्यांच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं.
साटम ACP प्रद्युमन म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर जादूचं केलं. पण आता परिस्थिती बदलली आहे. सीआयडीमध्ये दमदार भूमिका बजावणारे साटम आता चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहेत.
एका मुलाखती दरम्यान त्यांनी दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, 'मला असं नाही म्हणायचं मला ऑफर्स मिळत नाहीत. आज माझ्याकडे एक-दोन ऑफर्स आहे. पण देखील हवे तसं नाहीत. मी मराठी रंगमंचावर काम केलं आहे. मला दमदार भूमिका करायला आवडतात..'
'हे माझं दुर्दैव आहे, की आता तसं लिखाण होत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूचं नुकसान आहे. एक अभिनेता म्हणून मला चांगल्या कामाची उणीव भासत आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकांना चांगल्या कलाकारांची उणीव भासत आहे.'
शिवाजी साटम यांनी 1988 साली नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्या 'पेस्टोनजी' चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. 'यशवंत', 'गुलाम-ए-मुस्तफा', 'युगपुरुषस हु तु तु', 'दाग, सूर्यवंशम', चायना गेट', 'पुकार', 'नायक', 'जोडी नंबर 1', 'बर्दाश्त', 'गर्व' आणि 'जिस देश में गंगा रहता है' या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील आपली महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाजी फक्त छोट्या पडद्यासाठी मर्यादित राहिले नाहीत.