पुन्हा एकदा सुष्मिता सेन ट्रोलर्सच्या निशाण्यावर; जाणून घ्या यावेळी अभिनेत्री का होतेय ट्रोल

मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहे.  

Updated: Jul 21, 2022, 05:16 PM IST
 पुन्हा एकदा सुष्मिता सेन ट्रोलर्सच्या निशाण्यावर; जाणून घ्या यावेळी अभिनेत्री का होतेय ट्रोल  title=

मुंबई : मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहे. सुष्मिताने ललित मोदीसोबतच्या नात्याची पुष्टी केल्यापासून तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. आता द्वेष करणाऱ्यांना सुष्मिताला टार्गेट करण्यासाठी एक नवीन कारण सापडलं आहे. ज्यासाठी ते अभिनेत्रीला टार्गेट करत आहेत.

का ट्रोल होतेय सुष्मिता सेन?
सुष्मिता सेनने नुकताच तिच्या सोशल मीडिया हँडलवर स्वतःचा एक आनंदी फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये सुष्मिता निळ्या रंगाचा आउटफिट आणि मोठा सनग्लासेस घालून कारमध्ये बसलेली दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केला तिचा फोटोमध्ये आय लव्ह युज!!! कॅप्शनसह शेअर केला आहे. पण सुष्मिताच्या फोटोमध्ये यूजर्सना असं काही दिसलं आहे, ज्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पहिल्यांदा सुष्मिताचा फोटो पाहून तिला ट्रोल का केलं जात आहे. हे कदाचित तुम्हाला समजले नसेल.  जर तुम्ही अभिनेत्रीचा फोटो काळजीपूर्वक पाहिला तर तिच्या सनग्लासेसच्या लेन्समध्ये कारमध्ये ठेवलेल्या दोन बाटल्यांच्या सावल्या दिसत आहेत. सुष्मिताच्या चष्म्याच्या लेन्समध्ये दिसणारी बॉटल वोडकाचे असल्याचे अनेक युजर्सचं मत आहे. या प्रकरणावर अनेक यूजर्स सुष्मिताला ट्रोल करत आहेत.

जाणून घेऊया सुष्मिताबद्दल युजर्सचं काय म्हणणं आहे?
सुष्मिताच्या फोटोवर एका यूजरने कमेंट केली आहे की मॅडम, हा वोडका काय आहे? दुसऱ्या युजरने लिहिलं, तुमच्या सनग्लासेसमध्ये दिसत आहे. तुमच्या कारमध्ये दोन शॅम्पेनच्या बाटल्या आहेत.  अशाप्रकारे अनेक युजर्सने तिला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत ट्रोल केल आहे.