बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता, 12 वर्षात एकही हिट चित्रपट नाही, तरीही 4700 कोटींचा मालक

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने 12 वर्षांमध्ये एकही हिट चित्रपट दिला नाही. आज तो 4700 कोटींचा मालक आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 6, 2025, 04:18 PM IST
बॉलिवूडचा फ्लॉप अभिनेता, 12 वर्षात एकही हिट चित्रपट नाही, तरीही 4700 कोटींचा मालक title=

Bollywood Biggest Flop Actor:  बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवनवीन चेहरे बघायला मिळतात. मात्र, येथे फक्त काहीच कलाकार फार वेळ टिकू शकतात. ज्यामध्ये काही कलाकार त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर गायब होतात. तर काही कलाकार खूप प्रयत्न करून देखील यशस्वी होत नाहीत. त्यानंतर ते चित्रपट उद्योगात दुसरा मार्ग निवडतात आणि यश मिळवतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने अभिनयात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो यशस्वी झाला नाही. आता तो एक मोठा उद्योगपती बनला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घेऊयात सविस्तर

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप अभिनेता

बॉलिवूड अभिनेता गिरीश कुमारने फक्त तीन वर्षे हिरो म्हणून काम केलं. पण त्याला एकही हिट चित्रपट मिळाला नाही. या अभिनेत्याचे वडील चित्रपटसृष्टीतील एक मोठे निर्माते आहेत. त्यांनी त्यांच्या मुलालाही मोठ्या प्रमाणावर लाँच केले, परंतु प्रेक्षकांना त्यांचे काम आवडले नाही. या अभिनेत्याने 2013 मध्ये एका रोमँटिक चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकला नाही. 

2016 मध्ये दुसरा चित्रपट केला त्यामध्ये देखील अभिनेत्याला अपयशाचा सामना करावा लागला. गिरीशने 'रमैया वस्तावैया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये श्रृती हासनसोबत तो रोमान्स करताना दिसला. हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर तो 'लवशुदा' या चित्रपटात दिसला. हा चित्रपट देखील प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. सलग दोन चित्रपट फ्लॉप होताच त्याने इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आता गिरीश हा 'टिप्स इंडस्ट्रीज'चा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. संगीतापासून ते चित्रपट निर्मिती आणि वितरणापर्यंतचे संपूर्ण काम तो पाहतो. त्यांच्या कंपनी टिप्स इंडस्ट्रीजची एकूण संपत्ती ही सुमारे 4700 कोटी रुपये इतकी आहे. आता तो एक यशस्वी निर्माता बनला आहे. गिरीशने 2016 मध्ये त्याची लहानपणीची मैत्रीण कृष्णा मंगवानीशी लग्न केलं. हे लग्न दोघांनी एक वर्ष लपवून ठेवलं. त्यांच्या लग्नाबाबत सर्व माहिती 2017 मध्ये उघड झाली. अभिनेता नेहमीच त्याचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवतो. त्याच्या लग्नाबद्दल देखील फारशी चर्चा झाली नाही.