Mahesh Bhatt : बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांनी कायमच त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला काही नवे विषय आणले. फक्त रुपेरी पडद्यावरूनच नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातही भट्ट यांनी कायमच सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. भट्ट यांच्या खासगी आयुष्यावरही अनेक चर्चा झाल्या. किंबहुना बऱ्याच मुद्द्यांवर परखडपणे मतं मांडणारे भट्ट स्वत:ला मात्र 'नाजायज औलाद' म्हणवतात. त्यामागचं कारणही सांगण्यापासून त्यांना संकोच वाटत नाही. पण, असं का ते एकदा जाणून घ्याच. (Bollywood Director Mahesh bhatt on his birth and son of a single mother )
एका मुलाखतीदरम्यान, वडील म्हणजे काय असतं हे प्रत्यक्षात काय असं तेच मला ठाऊक नाही कारण, माझे वडिलच नव्हते असं ते म्हणाले होते. वडिलांची आठवण नाही, त्यांची भूमिका काय याचा अंदाज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मी शिरीन मोहम्मद यांची 'नाजायज औलाद' आहे... असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं.
(Bollywood) चित्रपटांच्या विश्वात प्रसिद्धी मिळू लागल्यानंतर भट्ट यांनी सातत्यानं आई आणि आपल्या नात्याला चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा निर्णय घेतला, तसा प्रयत्नही केला. 'जख्म', 'हमारी अधुरी कहानी' ही त्याचीच काही उदाहरणं.
कोण होते महेश भट्ट यांचे वडील? (Mahesh Bhatt Father)
महेश भट्ट यांची आई, गुजराती चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री होती. तर, वडील नाना भाई भट्ट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांचं नाव ब्राह्मण समाजाशी जोडलं गेलं होतं. शिरीन मोहम्मद अली यांच्यावर नाना भाई भट्ट यांचा जीव होता. पण, समाजाच्या दबावामुळं त्यांना लग्न करता आलं नव्हतं. 'चालीस करोड़' (1946), 'लक्ष्मी नारायण' (1951), 'मिस्टर एक्स' (1957), 'आधी रात के बाद' (1965) आणि 'कब्ज़ा' (1985) या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती.