30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा

Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 28, 2024, 05:29 PM IST
30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा  title=
(Photo Credit : Social Media)

Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांचा सुपरहिट सिनेमा 'करण अर्जुन' (Karan Arjun Movie) तब्बल 30 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे. 

सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'राखी जी यांनी खरं सांगितलं होतं की 'मेरे करण अर्जुन आएंगे'. हा चित्रपट जगभरातील चित्रपट गृहांमध्ये री रिलीज होण्यासाठी तयार आहे'. सलमान खानने शेअर केलेल्या या पोस्ट खाली फॅन्सने आनंद व्यक्त केला आहे.  शाहरुख आणि सलमान खान यांचा 'करण अर्जुन' चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी री रिलीज होणार आहे. 

ब्लॉकबस्टर 'करण अर्जुन' चित्रपट : 

'करण अर्जुन' हा एक कल्ट क्लासिक चित्रपट असून याची कहाणी ही करण (सलमान खान) आणि अर्जुन (शाहरुख खान) यांच्या भोवती फिरते. हे दोघे आपल्या आईची रक्षा करताना ठाकूर संग्राम सिंह सोबत लढाई करतात आणि त्यात मारले जातात. त्यांच्या मृत्यूनंतर आईला आश्वासन देण्यात आले की तिचे करण अर्जुन परत येतील. चित्रपटात त्यांचा पुनर्जन्म होऊन त्यांना गावाच्या दिशेने जाताना दाखवले आहे, जिथे त्यांची आई आपल्या दोन्ही मुलांची वाट वाट पाहत असते. या चित्रपटात अभिनेत्री काजोल आणि ममता कुलकर्णी या देखील मुख्य भूमिकेत आहेत. 

हृतिक रोशनने व्यक्त केला आनंद : 

30 वर्षांनी 'करण अर्जुन' हा चित्रपट री रिलीज होणार असल्याने यावर अभिनेता हृतिक रोशन याने आनंद व्यक्त केला आहे. हृतिकने वडील राकेश रोशन यांच्यासोबत ‘करण अर्जुन’ या चित्रपटात काम केले होते. 'करण अर्जुन' च्या रिलीजपूर्वी सिनेमा खूपच वेगळा होता. करण अर्जुन पुन्हा चित्रपटगृहांमध्ये दाखल होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. चित्रपट गृहात येऊन सिनेमाचा अनुभव घ्यावा असे आव्हान त्याने प्रेक्षकांना केलंय.