बेस्ट फ्रेंड्स असतानाही का दुरावल्या ईशा- करीना? एकीच्या प्रेमप्रकरणामुळं दुसरी ठरली खलनायिका, पाहा नेमकं काय घडलेलं

Bollywood News : बॉलिवूडमध्ये कधीकाळी ज्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले जात होते त्याच या दोघी. जीवाभावाच्या मैत्रीणी एकाएकी एकमेकींकडे पाठ फिरवून का गेल्या? त्यांच्या मैत्रीच्या नात्यात अशी कोणती ठिणगी पडली?     

सायली पाटील | Updated: May 17, 2023, 03:05 PM IST
बेस्ट फ्रेंड्स असतानाही का दुरावल्या ईशा- करीना? एकीच्या प्रेमप्रकरणामुळं दुसरी ठरली खलनायिका, पाहा नेमकं काय घडलेलं  title=
Bollywood Actress Kareena Kapoor Esha Deol friendship broke because of Zayed Khan Sussanne Khan read inside details

Bollywood News : हिंदी कलाजगतामध्ये आजवर अनेक कलाकारांच्या जोड्यांनी चाहत्यांच्या नजरा वळवल्या. यामध्ये काही जोड्या त्यांच्या नात्यात असणाऱ्या अनोख्या बंधांमुळं चर्चेत आल्या, तर काहींमध्ये सुरु झालेला वाद चर्चांना वाव देऊन गेला. यारी, दोस्ती और प्यार... या काहीशा अतिशय फिल्मी ओळीला साजेसं नातं होतं अभिनेत्री (Kareena Kapoor Esha Deol ) ईशा देओल आणि करीना कपूरचं. पण, त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टीकली नाही, यामागची कारणंही तितकीच गंभीर होती. 

शाळेपासूनची मैत्री कोणामुळं तुटली? 

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये करीनानं ईशाचा उल्लेख आपली सर्वात जवळची मैत्रीण म्हणून केला होता. आपले फार मोजके मित्र आहेत असं सांगताना तिनं ज्यांची नावं घेतली त्यामध्ये ईशाचंही नाव होतं. सगळंकाही व्यवस्थित होतं आणि एके दिवशी बातमी आली ईशा देओलच्या लग्नाची. इथं ईशाच्या लग्नाचे फोटो समोर आले आणि तिथं करीना न दिसल्यामुळं अनेकांना धक्काच बसला. 

हेसुद्धा वाचा : Premature Baby आणि दुरावा; प्रसूतीनंतर डाएट? छे... त्या बदलांविषयी नव्यानं आई झालेली लोकप्रिय अभिनेत्री काय म्हणतेय ऐकाच 

 

माध्यमांनी 'बेबो'ला गाठलं आणि याबाबतचे प्रश्नही केले. ज्याचं उत्तर देत तिनं आपण चित्रीकरणात व्यग्र असल्याचं सांगितलं होतं. ईशानं आपल्याला आणि कुटुंबालाही लग्नाचं आमंत्रण पाठवल्याचं करीनानं त्यावेळी सांगितलं होतं. पण, या साऱ्या चर्चा आणि वक्तव्य एका बाजूला आणि या मैत्रीच्या नात्यातील दुराव्याची दुसरी बाजू एका बाजूला असंच काहीसं झालं. 

त्या दोघी आणि 'तो'

ईशा, आहाना आणि करीना यांच्या मित्रमंडळींपैकीच एकानं या बाबतचं गुपित सांगितलं. एका प्रसिद्ध संकेतस्थळाच्या वृत्तानुसार ईशा त्यावेळी तिचा सहकलाकार Zayed Khan याच्यासोबत जास्त वेळ व्यतीत करत होती. त्यांच्यात जवळीक वाढत होती. पण, हे सर्व ईशाच्या आई हेमा मालिनी यांना रुचलं नाही. ज्यामुळं त्यांनी करीनाला ईशाची मैत्रीण म्हणन तिच्याशी बोलण्यास सांगितलं, तिला कारकिर्दीकडे लक्ष देण्याचा सल्ला द्यायला सांगितलं. बस्स... मग काय, एका क्षणिक नात्यामुळं इतक्या वर्षांच्या मैत्रीत मीठाचा खडा पडला आणि करीना- ईशामध्ये दुरावा निर्माण झाला.

तिथून हृतिक रोशनसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळं Zayed Khan ची बहीण सुझॅन खान हिनंही ईशाच्या मनात करीनाविरोधात मत तयार केलं आणि मतभेद आणखी वाढले. त्यावेळी अमृता अरोरानं ईशा आणि करीनामधील वाद मिटवण्यास पुढाकार घेतला पण, तेव्हाही Zayed च्या प्रेमापोटी ईशानं तिच्याशी वाद घातल्याचं म्हटलं गेलं. अमृताला ईशा नको नकोते बोलली आणि वाद विकोपास गेला. हे सर्वकाही पाहून करीनानंच शेवटी ईशाशी असणारी सर्व नाती तोडली आणि त्या क्षणापासून अमृता- करीनाची मैत्री आणखी घट्ट झाली.