मुंबई: ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या विनता नंदा यांनी आता अतिशय तीव्र शब्दांमध्ये 'बाबुजीं'वर आगपाखड केली आहे.
विनता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाविषयी सर्वांना माहिती दिली होती. ज्यात त्यांनी नाव न घेताच आलोकनाथ यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचं स्पष्ट केलं होतं.
नंदा यांनी केलेले सर्व आरोप हे खोटे असल्याचं सांगत त्यांच्यावर तसा प्रसंग ओढावलाही असेल, असं म्हणत आलोकनाथ यांनी कोणीतरी दुसरंच या प्रकरणात दोषी असल्याची प्रतिक्रिया दिली.
'मी या प्रकरणी आणखी काहीच बोलू इच्छित नाही', असं म्हणत त्यांनी ही चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, खुद्द विनता यांनी मात्र मोठ्या निर्धाराने आपण आता पुढची पावलं उचलणार असल्याचं सांगितलं.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुासार माध्यमांशी संवाद साधत विनता यांनी आपली भूमिका मांडली.
I am meeting consultants and advisors today evening, so by tomorrow I will have the next course of action ready. I am not ashamed of anything, it is he who should feel ashamed: Vinta Nanda,Writer and producer who leveled rape allegations against #AlokNath pic.twitter.com/Doi2AoLAAA
— ANI (@ANI) October 9, 2018
२००३, ०४ आणि २००५ मध्येही त्यांचं हेच मत होतं. पण, मुळात आता या प्रकरणी मला कशाचीही भीती नसून तेच परिस्थितीला घाबरले आहेत, असं त्या म्हणाल्या.
I am meeting consultants and advisors today evening, so by tomorrow I will have the next course of action ready. I am not ashamed of anything, it is he who should feel ashamed: Vinta Nanda,Writer and producer who leveled rape allegations against #AlokNath pic.twitter.com/Doi2AoLAAA
— ANI (@ANI) October 9, 2018
आलोकनाथ यांना लाज वाटली पाहिजे, असं म्हणत आपण सदर प्रकरणी पुढची पावलं उचलणार असल्याचं म्हणत त्यांनी या संस्कारी बाबुजींवर आगपाखड केली आहे.
दरम्यान, आपण दोषी नसल्याचच म्हणणारे आलोकनाथ आता नंदा यांच्या भूमिकेवर नेमकं काय म्हणतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.