नवी दिल्ली : अभिनेता सलमान खान याचा फैसला थोड्यात वेळात होणार आहे. काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाचा निकाल थोड्याच वेळात हाती येण्याची शक्यता आहे. सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे
ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.
'हम साथ साथ हैं ' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला.
कनिष्ठ न्यायालयात अंतिम युक्तिवाद २८ मार्चला संपल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी निकाल ५ एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता. सलमान मुंबईहून चार्टर्ड विमानातून येथे आला. त्यापूर्वी तो 'रेस ३'च्या चित्रीकरणासाठी अबू धाबी येथे होता. सोनाली, सैफ, तब्बू व नीलम हेही मुंबईहून जोधपूरला पोहोचले आहेत.