मुंबई : टेलिव्हिजनवरील बच्चेकंपनीचे आवडते सुपरहिरो शक्तिमान, गंगाधर आणि मोठ्यांचे आदरणीय भीष्म पीतामह असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनात वेगळे स्थान निर्माण केलं आहे. मुकेश खन्ना यांनी साकारलेल्या शक्तिमान, भीष्म पीतामह या भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहेत. टेलिव्हिजनवरील आपल्या भूमिकेने सर्वांना खिळवून ठेवणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी नुकताच ६१वा वाढदिवस साजरा करत आहेत.
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रमांपैकी एक असणाऱ्या 'महाभारत'मध्ये भीष्म पितामह यांची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांना सर्वात आधी दुर्योधनच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. परंतु मुकेश खन्ना यांनी ही भूमिका साकारण्यासाठी नकार दिला होता. याबाबत त्यांनी नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ते नकारात्मक भूमिका साकारु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी दुर्योधनाच्या भूमिकेसाठी स्पष्ट नकार दिल्याचं म्हटलं होतं. जर मुकेश खन्ना यांनी पहिल्यांदाच ऑफर केलेली दुर्योधनाच्या भूमिकेसाठी होकार दिला असता तर मुकेश खन्ना दुर्योधनाची भूमिका साकारताना दिसले असते.
मुकेश खन्ना यांनी १९८४ मध्ये कलाविश्वात पाऊल ठेवलं. त्यांनी काही चित्रपटांमधूनही काम केलं. परंतु १९८०च्या दशकात बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'ने मुकेश खन्ना यांनी एक वेगळीच उंची गाठली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या 'शक्तिमान' मालिकेतून त्यांनी साकारलेला 'शक्तिमान' आणि 'गंगाधर' या व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या मनात कायम आहे. त्यांच्या या भूमिकेलाही चाहत्यांची चागंलीच पसंती मिळली होती.