मुंबई : कलाविश्वातील बहुचर्चित जोडप्यांपैकी एक कपल म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी. अनेकदा दोघांना एकाचं ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण अद्यापही दिशा आणि टायगरने नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही. टायगर आणि दिशाची जोडी कायम चर्चेचा विषय ठरत असते. सध्या रंगणाऱ्या चर्चांमागे महत्त्वाचं कारण म्हणजे दिशाचं खासगी आयुष्य. दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ.
टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी दिशा ही एका टेलिव्हिजन अभिनेत्याला डेट करत होती. 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेता पार्थ समथानला दिशा डेट करत होती. पार्थ आणि दिशा जवळपास एक वर्ष रिलेशशिपमध्ये होते.
एका वर्षानंतर खुद्द दिशानेच नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण होता बिग बॉस स्पर्धक विकास गुप्ता. पार्थ आणि विकासचं अफेअर सुरु झाल्यानंतर दिशाने पार्थपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं समजलं.
एका रिपोर्टनुसार, 'पार्थ हा बायसेक्शुअल होता. दिशासोबतच असतानाचं पार्थ विकासच्याही संपर्कात होता. पार्थ आणि विकासचे खासगी फोटो पाहिल्यानंतर दिशाने पार्थसोबत असलेलं नात तोडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पार्थसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशाने करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. सध्या दिशा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. अभिनयासोबतचं दिशा अतिशय फिटनेस फ्रिक आहे.