रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; दिपीकाचीही झाली अशी अवस्था, जाणून तुम्हालाही बसेल धक्का

अभिनेता रणवीर सिंग बँड बाजा बारात या आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर अभिनेत्या कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. 

Updated: Apr 17, 2023, 08:26 PM IST
रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; दिपीकाचीही झाली अशी अवस्था, जाणून तुम्हालाही बसेल धक्का title=

Ranveer Singh : रणवीर सिंग बॉलिवूडमधला सगळ्यात खोडकर अभिनेता आहे. तो त्याच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत असतो. त्याची अतरंगी फॅशन नेहमीच त्याच्या चाहत्यांन आवडते. मॅचिंगचा विचार न करता रणवीर नेहमीच कशीही फॅशन करुन चर्चेत असतो.  रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनेत्याने बँड बाजा बारात या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आता रणवीर संबधिक एक मोठी बातमी समोर येत आहे. एका पेक्षा एक चित्रपट देणार रणवीर सध्या फ्लॉपवर फ्लॉप देणाऱ्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. 

अभिनेता रणवीर सिंग बँड बाजा बारात या आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर अभिनेत्या कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. '83' या सिनेमापासून ते 'जयेशभाई'सारखे अनेक सिनेमा त्याचे फ्लॉप होत आहेत. २०२२ मध्ये अभिनेत्याचे बहुतेक सिनेमा फ्लॉप झाले. अशा परिस्थितीत रणवीर सिंगवरुन आता निर्मात्यांचा विश्वास उडत चालला आहे. निर्मात्यांना तोटा सहन करावा लागत आहे. 200 कोटींच्या सर्कसने केवळ 35.65 कोटींची कमाई केली होती.

एवढंच नव्हेतर रणवीरसोबतचे चांगले संबध यशराज फिल्म्स कंपनीने तोडले होते. आता अभनेत्या बाबतची एक मोठी बातमी समोर येत आहे. समोर आलेल्या बातमीनुसार कंपनीने रणवीर सिंगसोबत कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

रणवीर सिंगसोबत काम करून यशराज फिल्म्सला खूप तोटा आणि त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे सध्या कंपनी रणवीर सिंगसोबत काम करू इच्छित नाही. तसेच त्यांच्यावर पैसे खर्च करण्याची कंपनीची इच्छा नाही.  आदित्य चोप्रा स्पाय युनिव्हर्सचा थ्रिलर बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अशा परिस्थितीत सध्या त्याच्याकडे अभिनेता रणवीर सिंगसाठी कोणतंही काम नाही.

या अभिनेत्याने यशराज फिल्म्ससोबत रासलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारख्या सिनेमात काम केले. जे सुपरहिट ठरले होते यासह त्याने अनेक हिट चित्रपटही दिले होते. रणवीर सिंगच्या सततच्या फ्लॉप कारकिर्दीमुळे दीपिका पदुकोणही तणावाखाली आहे.