अभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य

Aryan Khan Not Want to be an Actor :शाहरुख खान (Shah Rukh Khan) नं मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं. दरम्यान, आर्यन अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानं अभिनय न करण्याचा निर्णय का घेतला हे देखील शाहरुखनं सांगितलं. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 14, 2023, 05:39 PM IST
अभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही; Shah Rukh Khan चं मुलाविषयी मोठ वक्तव्य title=
(Photo Credit : Pooja Dadlani Instagram/ Aryan khan Instagram)

Aryan Khan Not Want to be an Actor : बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच स्टारकिड्स देखील तितकेच चर्चेत असतात. काही स्टार किड्सनं तर अजून मनोरंजन क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं नाही. तरी त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) आहे. आर्यन खान त्याच्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असतो. आर्यन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर दुसरीकडे शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

शाहरुखचा हा जुना व्हिडीओ त्याच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. तर इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुख खानला आर्यनच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'माझा मुलगा आर्यन याला अभिनेता बनायचे नाही आणि मला वाटत नाही की तो अभिनेता होऊ शकतो. आमच्या देशात असं बोलतात की अभिनेत्याचा मुलगा हा अभिनेता बनतो आणि असे अनेकदा होते. आर्यन हा दिसायला चांगला आहे. उंच आणि देखणाही आहे. एक चांगला अभिनेता होण्यासाठी जे पाहिजे ते त्याच्यात नाही. हे त्याच्या लक्षात आलं. पण तो एक उत्तम लेखक असून त्यात तो उत्तम काम नक्कीच करू शकतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे शाहरुखला विचारण्यात आलं की तुला असं वाटल्याचं तू आर्यनला सांगितलं का? त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला, 'मला वाटतं हे मला त्याच्यामुळेच कळलं. एक दिवस तो आला आणि म्हणाला, मी अभिनय करायला हवा हे मला वाटतं नाही. त्यात अडचण आहे जी खरंतर त्यानं विचार करून सांगितली आणि ती योग्य देखील आहे. प्रत्येकवेळी माझी तुझ्याशी तुलना करण्यात येईल. मी चांगलं केलं तर ते त्यापाठशी मेहनत पाहणार नाही तर म्हणतील तो शाहरुखचा मुलगा आहे, त्यात ती स्कील असणारच आणि जर मी चांगलं केलं नाही तर ते म्हणतील की त्याला इतकं पण नाही येत. तर तो म्हणाला त्याला या सगळ्यात पडायचं नाही.' 

हेही वाचा : 'बरं झालं तिचं वजन वाढलं...', सेलिब्रिटी पार्टीमधील गॉसिप ऐकून Hruta Durgule ला बसला धक्का

दरम्यान, आर्यन खाननं फिल्ममेकिंगचे शिक्षण ङेतले आहे. लवकरच आर्यनला आपण लेखक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहू शकतो. तर शाहरुखच्या मुलीविषयी बोलायचं झालं तर सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.