अनन्या पांडे-आदित्य कपूरचं नात सर्वांसमोर; या ठिकणी दिसले एकत्र

भिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहे. दोघंही कधी वेकेशनवर तर कधी लंच आणि डिनर डेटवर दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नसले तरी त्यांच्या प्रेमाची चर्चा चित्रपट वर्तुळात होत आहे. 

Updated: Oct 4, 2023, 09:17 PM IST
अनन्या पांडे-आदित्य कपूरचं नात सर्वांसमोर; या ठिकणी दिसले एकत्र title=

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहे. दोघंही कधी वेकेशनवर तर कधी लंच आणि डिनर डेटवर दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नसले तरी त्यांच्या प्रेमाची चर्चा चित्रपट वर्तुळात होत आहे. आता पुन्हा एकदा हे कपल एकदा एकत्र दिसले आहेत.

आदित्य आणि अनन्या पोहोचले चित्रपट बघायला 
 मंगळवारी मुंबईत 'थँक यू फॉर कमिंग'च्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. या भव्य स्क्रीनिंग इव्हेंटमध्ये अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती, ज्यामध्ये हे लव्हबर्ड्स देखील एकत्र दिसले होते. बॉलीवूड इंडस्ट्रीतील नवीन कपलपे आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे यावेळी एकत्र दिसले. त्यामुळे पुन्हा एकदा हे कपल रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला एका फॅशन शोमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एकत्र रॅम्पवर दिसले होते. इतकंच नाही तर फेब्रुवारीमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या मुंबई रिसेप्शनमध्येही हे दोघं एकत्र दिसले होते. अनन्या पांडेही आदित्य रॉय कपूरच्या द नाईट मॅनेजर वेब सीरिजच्या स्क्रिनिंगवेळी चीअर करण्यासाठी आली होती.

आदित्य आणि अनन्याने पोर्तुगालमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंण्ड करताना दिसले होते.  स्पेनमधील लाइव्ह कॉन्सर्टनंतर ती लिस्बनमधील रेस्टॉरंटमध्येही दिसली होती. यादरम्यान दोघंही ड्रिंक्सचा आनंद लुटताना दिसले. यापूर्वी लिस्बनमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये आदित्य अनन्याला मिठी मारताना दिसला होता. या फोटोंद्वारे दोघांनीही त्यांच्या नात्याला पुष्टी दिली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनन्याचे आगामी चित्रपट
अनन्या आणि आदित्यच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री अलीकडेच ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात दिसली होती. तर 'खो गए हम कहां' हा तिचा आगामी सिनेमा आहे. याशिवाय ती विक्रमादित्य मोटवाने यांच्या सायबर थ्रिलर कंट्रोलमध्ये दिसणार आहे.  तर आदित्य 'मेट्रो इन दिनों'मध्ये दिसणार आहे.