आर्थिक नुकसानानंतरही मराठी अभिनेत्रीनं जिद्दीनं परत सुरू केलं बंद झालेलं हॉटेल! स्वत: केला खुलासा

Angha Atul Vadani Kaval Hotel: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अनघा अतुल हिची. तिनं पुण्यात एक नवं हॉटेल सुरू केलं आहे. यावेळी हे हॉटेल सुरू करण्याबाबत खुलासा केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 12, 2023, 03:34 PM IST
आर्थिक नुकसानानंतरही मराठी अभिनेत्रीनं जिद्दीनं परत सुरू केलं बंद झालेलं हॉटेल! स्वत: केला खुलासा  title=
anagha atul shares her experience of opening an hotel in pune

Angha Atul Vadani Kaval Hotel: सध्या टेलिव्हिजन अभिनेत्रींचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. रंग माझा वेगळा ही मालिकेलाही प्रचंड गाजली होती. काही दिवसांपुर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यानंतर अभिनेत्री अनघा अतुल हिनं आपलं नवं हॉटेल सुरू केलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं अनेकदा याचे फोटो शेअर केले होते. आता तिच्या हॉटेलचा शुभारंभ झाला असून या हॉटेला चाहत्यांचा आणि खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद येताना दिसतो आहे.

'वदनी कवळं' या तिच्या नव्या हॉटेलचं नावं आहे. अतुलशास्त्री भगरे गुरूजींची अभिनेत्री अनघा अतुल ही कन्या आहे. त्यामुळे तिची सर्वत्र जोरात चर्चा असते. सध्या तिच्या या नव्या हॉटेलच्या निमित्तानं तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

आपल्या या नव्या हॉटेलच्या प्रवासाबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीतून खुलासा केला आहे. कोणतंही नवं काम सुरू करणं हे कोणासाठीच सोप्पं नसतं. त्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला साध्य कराव्या लागतात. त्यातून बिझनेस म्हटलं तरी पैशांचे व्यवस्थापन, प्रोडक्ट, कस्टमर केअर या सर्वांचाच विचार करावा लागतो. अभिनेत्री अनघा अतुलनं फारच कमी वयात हे सर्वकाही साध्य केलं आहे. तिचं हे हॉटेल हे शुद्ध शाकाहरी आहे. त्यातून येथे महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी मिळते. त्यामुळे खवय्यांना शुद्ध शाहाकरी हॉटेल असल्यानं त्यांनाही अगदी घरगुती जेवणं मिळतं. पुण्यातील डेक्कन परिसरात तिचे हे हॉटेल आहे. तिनं आपल्या भावासह अखिलेश भगरेसह हे हॉटेल सुरू केलं आहे. 

हेही वाचा : मध्यरात्रीच्या जवळची वेळ कोणती? चार पर्याय देऊनही युझर्सना बरोबर उत्तर सापडेना; पाहा

19 ऑक्टोबर पाहून हे हॉटेल ग्राहकांच्या सेवेसाठी हजर झालं आहे. तिनं यापुर्वी सुरू केलेल्या हॉटेलविषयी एक मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी तिला आणि तिच्या परिवाराला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. 'अल्ट्रा मराठी बझ' या दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ''हे मी अजूनपर्यंत कुठे बोलली नाही. पण 2020 मध्ये 'वदनी कवळ' सुरू केलं होतं. 15 मार्च 2020 रोजी बाणेरमध्ये पहिलं हॉटेल सुरू केलं होतं. पूजाही संपन्न झाली होती. तेव्हा बाणेरमधील चांगल्या परिसरात दोन मजली हॉटेल होतं. खूप खर्च केला होता. त्यावेळेस पंजाबी थाळी, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन थाळी असं सगळं ठेवण्यात आलं होतं. हॉटेल 15 मार्चला सुरू केल्यानंतर 20 मार्चला लॉकडाऊन झालं. त्यामुळे आम्हाला ही बाजू एक्स्प्लोर करताच आली नाही. लोकांना सर्व्ह करता आलं नाही.'' 

त्यापुढे ती म्हणाली की, ''हा एक लॉकडाऊन नाही तर लागोपाठ तीन लॉकडाऊन झाले. म्हणून वर्षभरात हे हॉटेल बंद करावं लागलं. त्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला. आम्ही त्यातून रिकव्हर होताना खूप विचार केला. हॉटेल विकण्याचा देखील विचार केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण कुठेतरी वाटतं होतं की आपण ज्या व्यवसायात अनुभवच घेतला नाही तर आपण त्यातून माघार कशी घेऊ शकतो? अखिलेशच्या डोक्यात आलं की, जे सामान आहे ते वाया घालवायचं नाही. त्याच्या मदतीने आपण काहीतरी करून या. कारण ते आपलं आहे. मग तिथून या हॉटेलसाठी सुरुवात झाली. या जागेवर आम्हाला जास्त खर्च करावा लागला नाही.'' अशी आठवण तिनं सांगितली नाही.