Alia Bhatt Marriage: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यातून आता या चित्रपटातील गाण्यांचीही सर्वत्र चांगलीच क्रेझ निर्माण झालेली आहे. या चित्रपटातील ‘कुडमयी’ हे गाणं सध्या विशेष गाजतं आहे. या गाण्याबद्दल एक करण जोहरनं एक आठवण सांगितली आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या पाच वर्षांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. अखेर त्यांनी 2022 च्या एप्रिलमध्ये लग्न केले आणि त्यानंतर लगेचच जूनमध्ये आलियानं आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली. आता त्यांची मुलगी ही 6 महिन्यांची झाली आहे. पापराझीही तिचा फोटो टिपण्यासाठी उत्सुक असतात.
रॉकी रंधावा आणि राणी चॅटर्जी यांची प्रेम कहाणी सध्या बॉक्स ऑफिसवर गाजते आहे. त्यातून ही स्टोरी फार आगळी वेगळी असून आपल्या कुटुंबियांची मनं जिंकून घेण्यासाठी एकमेकांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू होतो आणि मग त्यांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबियांतील होकार देतात आणि मग त्यांचे लग्न होते. या चित्रपटात त्यांच्या लग्नाचाही खूप गोड प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. यावेळी त्यांचे लग्न हे अत्यंत शाही पद्धतीनं होतं आणि सोबतच त्यांच्या लग्नाचा थाट हा फारचं घरंदाज आणि पारंपारिक पाहायला मिळतो. यावेळी चित्रपटातून वाजते ते 'कुडमयी' हे गाणं. या गाण्याचीही सध्या तरूणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. सध्या या गाण्याच्या लॉन्च निमित्त पत्रकार परिषेदचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा करण जोहरनं एक किस्सा सांगितला आहे.
हेही वाचा - 'हम आपके हैं कौन'मधील 'तो' प्रसंग पाहून रेणुका शहाणे यांचा मुलगा संतापला? कारण आलं समोर
हे गाण जैसलमैरमध्ये शूट झाल्याचे करण जोहरनं सांगितले. त्यावेळी तो म्हणाला की आलियानं त्यावेळी दोनदा लग्न केले होते. करण जोहर म्हणाला, ''आलिया आणि रणबीर कपूरच्या खऱ्या लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच या गाण्याच्या शूटिंगचे शेड्यूल आम्ही आखले होते. आलियाच्या ‘रिअल’ लाइफ लग्नानंतर आम्ही या ‘रील’ लग्नाचे शूट केले. त्यामुळे आलियाने एकाच आठवड्यात दोनदा लग्न केलं. तिच्या खऱ्या लग्नाची मेहंदी माझ्या टीमने फक्त डार्क केली होती.”
यावेळी आलिया म्हणाली की, “माझ्या खऱ्या लग्नाचा लेहेंगा एकदम हलका होता पण या चित्रपटासाठी मी जड लेहेंगा परिधान केला होता. चित्रपटात सात फेरे घेताना आजूबाजूचे लोक म्हणत होते, ‘नवरा मुलगा पुढे चालणार’ मी त्यांना म्हणाले, नाही! मुलगी पुढे कारण माझे नुकतेच लग्न झाले आहे.” असा किस्सा दोघांनी सांगितले.