नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बहुचर्चित सिनेमा 2.0 सिनेमागृहात दाखल झालाय. सिनेमाच्या प्रदर्शनापासूनच सिनेचाहत्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेयं. ट्रेंड अॅनालिस्टच्या मतानुसार अॅडव्हान्स बुकिंगमध्ये '2.0' सिनेमाने एवेंजर्स आणि बाहुबली ला देखील मागे टाकलंय. रिलीज होताच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. '2.0' ने जगभरात मिळून 103 कोटींची कमाई केलीय. ट्रेंड अॅनालिस्ट सुमित कादेल यांच्या म्हणण्यानुसार '2.0' ने हिंदीमध्ये 20 कोटी तर साऊथमध्ये 41 कोटींचा व्यवसाय केलाय. अक्षय कुमारच्या नावे ही नवा रेकॉर्ड तयार झालाय.
#2point0 opened with EARTH SHATTERING response down south. Registering colossal 95% occupancy since early morning show.
— Sumit kadel (@SumitkadeI) November 29, 2018
'2.0' सिनेमाने अक्षयच्या मागील 5 ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या स्टार्सच्या रांगेत अक्षय सध्या अव्वल स्थानी आहे. '2.0'हा सिनेमा अक्षयचा आतापर्यंतचा मोठी ओपनिंग मिळालेला सिनेमा ठरलाय. या वर्षाची अखेर ही अक्षयने '2.0' या दमदार सिनेमाने केलीय.
In Terms of Concept & Visualization #2Point0 is by Far the BEST film in HISTORY of INDIAN CINEMA #2Point0FDFS
— Rohit Jaiswal (@rohitjswl01) November 29, 2018
यावर्षी अक्षयच्या 'गोल्ड' ने चांगला व्यवसाय केला. 'पॅडमॅन'नेही चांगला व्यवसाय केला.
चित्रपटाचा विषय एका वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असून चित्रपटाची निर्मिती 3डी स्वरूपात करण्यात येणार आहे. हॉलीवूडच्या तोडीस तोड असलेल्या 2.0 या चित्रपटाचं बजेट तब्बल 500 कोटी रुपये एवढं आहे. या चित्रपटात रजनीकांत आणि अक्षयकुमारबरोबरच एमी जॅक्सन, सुधांशु पांडे, आदिल हुसैन सारखी तगडी टीम दिसतेय.