काही वर्षांपासून अक्षय कुमार सोलो हिटची वाट पाहत आहे पण अक्षय कुमारने सलग १० फ्लॉप चित्रपट दिले आहेत आणि आता तर त्याचा चित्रपट 'भूल भुलैया'चा सिक्वेल त्याचा हातून गेला आणि तो कार्तिक आर्यनला मिळाला. अशातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे की, अक्षय कुमारच्या हातून आणखी एक हिट चित्रपटाचा सिक्वेल गेला आहे. ही गोष्ट ऐकून अक्षय कुमारचे चाहते अजूनही चकित आहेत की अक्षय कुमारचा हिट चित्रपट 'सिंग इस किंग'चा सिक्वेल त्याच्या हातून गेला आहे.
'सिंग इस किंग' 2008 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमारनं कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर केली होती. ज्या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते . कॉमेडी , अॅक्शन मिळून अक्षय कुमारने खूपच छान चित्रिकरण केले होते. या चित्रपटाचा निर्माता शैलेश सिंग आता परत एका नव्या स्टारकास्टसोबत नवीन चित्रपट तयार करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटासोबत 'सिंग इस किंग'च्या सिक्वेलसाठी त्यांनी 'सिम्बा' अभिनेता रणवीर सिंगने मुख्य भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती . शैलेश सिंगला असे वाटते की रणवीर सिंग एक एनर्जेक्टिक आणि आकर्षक अभिनेता आहे जो या मुख्य भुमिकेसाठी परिपूर्ण आहे. रणवीर सिंगसोबत दिलजीत दोसांज सुद्धा एक चांगला पर्याय असल्याचं शैलेश सिंग यांनी म्हटलं आहे.
शैलेश सिंग आपल्या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याचा शोध घेत आहेत. म्हणजेच याचा अर्थ की अक्षय कुमारकडून 'सिंह इज किंग' चित्रपटाचा सिक्वेल निघून गेलाय. कार्तिक आर्यनने पहिलेच 'भूल भुलैया' चित्रपटावर कब्जा केलाय तर शैलेश सिंग यांच्या मते, अक्षय कुमारचा हा अजून एक चित्रपट रणवीर सिंगला देण्याचा विचारात आहे. 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'सिंघम अगेन' चित्रपटात रणवीर सिंग आणि अक्षय कुमार दिसले होते. या चित्रपटात दोघांची जबरदस्त कॉमेडी आणि अॅक्शन पाहायला मिळत आहे. याआधी देखील अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात दोघांची जोडी पाहायला मिळाली होती.