हॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशातच आता एका हॉलिवूड अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 15, 2024, 03:48 PM IST
हॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा title=

Hollywood Actress :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा भारतातच नाही तर परदेशात देखील खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यावर जगभरातील लोक प्रेम करतात. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. शाहरुख खानने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या शाहरुख खानसोबत काम करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. अशातच आता एका हॉलिवूडमधील अभिनेत्री शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

अलीकडेच ऑस्कर विजेती हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमनने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निकोल किडमन म्हणाली की, शाहरुख खानसोबत काम करणे खूप छान होईल.

हॉलिवूड चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या निकोल किडमनने Zoomशी संवाद साधताना सांगितले की, 'मी जयपूर, गोवा इत्यादी अनेक शहरांमध्ये गेले आहे. मी ऐश्वर्या राय बच्चनला भेटले. ईशान खट्टरसोबत 'द परफेक्ट कपल' या मालिकेत काम केले आहे. ते आपल्या देशासाठी मजबूत काम करत आहेत'. चाहत्यांना वाटत आहे की, निकोल किडमनने आणि शाहरुख खानने एकत्र काम करावे. त्यावर अभिनेत्री निकोल किडमनने सांगितले की हे खूप चांगले होईल. 

ह्यू जॅकमॅनने देखील याआधी व्यक्त केली होती इच्छा

याआधी डेडपूल आणि वूल्वरिन फेम अभिनेता ह्यू जॅकमॅनने देखील शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. Marvel India ला दिलेल्या मुलाखतीत ह्यू जॅकमॅनला बॉलिवूडमधील कोणत्या कलाकारासोबत काम करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ह्यू जॅकमॅनने शाहरुख खानचे नाव घेतले होते. तो म्हणाला की, शाहरुख खानसोबत अनेक वर्षांमध्ये संभाषण झाले आहे. पण एक दिवस आम्ही एकत्र काम करू शकतो हे अद्याप माहिती नाही. 

शाहरुख खानचा आगामी चित्रपट 

शाहरुख खानच्या आगामी चित्रपट 'मुफासा: द लायन किंग' च्या रिलीजसाठी खूप उत्सुक आहे. कारण त्याने या चित्रपटातील मुफासा या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे. 20 डिसेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होत आहे. याशिवाय शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपट 'किंग' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याची मुलगी सुहाना खान देखील या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.