Mukesh Khanna Angry On Kapil Sharma: ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी 'महाभारत' मधील भीष्म पितामह आणि शक्तिमान अश्या प्रसिध्द टी.व्ही. मालिकांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुकेश खन्ना विशेषतः त्याच्या स्पष्ट व्यक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते नेहमी ब्लॉग, सोशल मीडिया पोस्ट आणि मुलाखतींमध्ये स्पष्टपणे आपली मतं मांडताना दिसतात. टी. व्ही असो किंवा सिनेसृष्टीतील अभिनेते सगळ्यांविषयीच मुकेश खन्ना बेधडक वक्तव्य करतात. अलीकडच्या एका मुलाखतीत त्यांनी कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याच्या शोवर सरळ निशाणा साधत टिका केली होती. खन्ना म्हणाले, "द कपिल शर्मा शोसाठी त्यांना कधी आमंत्रण दिलं गेलं नाही आणि दिलं जरी आमंत्रण आलं असतं, तरीही त्यांनी ते नाकारलं असतं."
मुकेश खन्ना यांनी खुलासा केला आहे की, "कपिल शर्माला काय अडचण होती जे त्याने कधी माझ्याशी संपर्क केला नाही, कदाचीत याला अहंकार म्हणता येईल''. महाभारत मालिकेतील कलाकारांना शोमध्ये बोलावल गेलं होत पण, मुकेश खन्ना गेले नाहीत. त्यांना या कार्यक्रमात शिस्तीची कमतरता दिसते. त्यांनी सांगितले की, ''रामायण मालिकेतील कलाकार गुफी पेंटलने मला कॉल केला आणि सांगितले की 'रामायण'च्या कलाकारांना कपिल शर्माच्या शोमध्ये आमंत्रित केले आहे. महाभारतातील कलाकारांनाही बोलावले जाण्याची शक्यता आहे".
हेही वाचा : हॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा
ते पुढे म्हणाले, ''मी एक प्रोमो पाहिला होता ज्यामध्ये अरुण गोविल आणि त्याची टीम बसली होती. त्यात रामाची भूमिका साकारलेले अरुण गोविल यांना व्यंगात्मक रितीने प्रश्न विचारण्यात आले. ज्याची पर्सनॅलिटी एवढी मोठी आहे त्यांना असे हास्यास्पद प्रश्न विचारणे चुकीचे आहे. जर कपिल रामाचा आदर करू शकत नाहीत, तर तो भीष्म पितामहांचे काय करणार? मी त्याच क्षणी ठरवले की मी या शोमध्ये कधीही जाणार नाही".
मुकेश खन्रा यांनी एका अवॉर्ड फंक्शनमधला किस्सा सांगितला. कपिल शर्मा 10 मिनिटे त्यांच्या बाजूला बसला होता पण तो एका शब्दानेही बोलला नाही. " कपिल चांगला विनोदी अभिनेता आहे, पण त्याच्यात खूप अहंकार आहे. इंडस्ट्रीत डिसेप्लीन खूप महत्त्वाचे आहे".