बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याचा मुलगा जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च झाला. या दरम्यान, आमिर खाननं स्वत: ला रोमॅन्टिक व्यक्ती म्हटलं. त्यानं हा देखील दावा केला की जर कोणला त्याच्या वक्तव्यावर विश्वास नाही तर त्याच्या दोन्ही पत्नींना अर्थात रीना आणि किरणला विचारा.
आमिर खाननं या कार्यक्रमात सांगितलं की 'खरंतर मी खूप रोमॅन्टिक व्यक्ती आहे. आई शपत्त, मी खूप रोमॅन्टिक आहे. हे बोलताना खूप विचित्र वाटतंय पण तुम्ही माझ्या दोन्ही पत्नींना विचारू शकतात. खरं बोलतोय, कारण मी तसाच आहे.'
आमिर खानचं लग्न आणि घटस्फोट कायमच चर्चेत राहिला आहे. त्यानं पहिलं लग्न हे 1986 ला रीना दत्ताशी केलं आणि त्यांना दोन मुलं आहेत जुनैद आणि आयरा. त्यानंतर 16 वर्षानंतर 2002 मध्ये विभक्त झाले. आमिरनं 2005 मध्ये चित्रपट निर्माता किरण रावशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव आजाद आहे. लग्नाच्या 15 वर्षानंतर त्यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. पण त्यांनी मिळून मुलाला सांभाळलं.
आयरानं नुपूर शिखरेशी जेव्हा लग्न केलं. तेव्हा या लग्नात संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. आयरा आणि तिची आई आमिरची दुसरी पत्नी किरण रावला भेटून लग्नाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्याआधी आयरानं इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केले होते. त्या सगळ्या फोटोंमध्ये आयराची आई रीना आणि सावत्र आई किरण राव एकत्र दिसले. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आमिर देखील त्यांच्यासोबत दिसला. त्याचं आणि त्याच्या दोन्ही पत्नींचं एकमेकांसोबत चांगलं बॉन्ड आहे.
दरम्यान, कामाविषयी बोलायचं झालं तर 'लाल सिंह चड्ढा' नंतर आता आमिर 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय त्याचं प्रोडक्शन हाउस अनेक चित्रपट बनवत आहे. ज्यात प्रीती झिंटा आणि सनी देओलचा देखील 'लाहौर 1947' हा चित्रपट आहे.