Burj Khalifa World Tallest Building : बुर्ज खलिफा माहित नाही असं क्वचितच कुणी तरी सापडेल. दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. जगभरातील लोकांना बुर्ज खलिफा पाहण्याची इच्छा असते. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात महागडी इमारत म्हणूनही ओळखली जाते. जाणून घेऊया बुर्ज खलिफा कुणाच्या नावावर आहे. जगातील सगळ्यात उंच इमारतीच्या मालकाचे नाव जाणून शॉक व्हाल.
2004 मध्ये बुर्ज खलिफाचे बांधकाम सुरू झाले आणि ते 2010 मध्ये पूर्ण झाले. ही इमारत बांधायला 6 वर्षे लागली. बुर्ज खलिफाच्या ग्लॅमरबद्दल तसेच त्यामध्ये असलेल्या फ्लॅट्स आणि हॉटेल्सच्या किंमतीची नेहमीच चर्चा असते. या सर्वात उंच इमारतीचा मालक कोण आहे? ही इमारत कोणी बांधली? जगातील सर्वात उंच इमारतीच्या मालकाची कहाणी जाणून घेऊया.
163 मजल्यांची बुर्ज खलिफा ही इमारत ही थेट गगनाला भिडणारी आहे. या इमारतीची विशेषतः म्हणजे बुर्ज खलिफाची उंची एवढी आहे की तुम्ही ती नव्वद किलोमीटर अंतरावरूनही ही इमारत दिसते. बुर्ज खलिफा पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन आहे. बुर्ज खलिफा इमारत इस्लामिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बुर्ज खलिफामध्ये 58 लिफ्ट आहे. बुर्ज खलिफामध्ये 2957 पार्किंग स्पेस आणि 900 अपार्टमेंट आणि 304 हॉटेल्स आहे.
बुर्ज खलिफाचे इमारत कोण्या एका व्यक्तीच्या नावावर नाही तर एका कंपनीच्या नावावर आहे. बुर्ज खलिफा इमारत एमार प्रॉपर्टीज या कंपनीच्या नावावर आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील ही एक प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. मोहम्मद अल्बर हे एमार प्रॉपर्टीजचे अध्यक्ष आहेत. मोहम्मद अल्बर यांच्या कल्पनेतुनच बुर्ज खलिफा इमारत ही प्रत्यक्षात साकारली आहे. बुर्ज खलिफा तीन कंपन्यांनी संयुक्तपणे बांधला आहे. या तिन्ही कंपन्यांचे स्वतःचे वेगळे कौशल्य वापरुन ही जगातील सर्वात उंच इमारत उभारली आहे.
Samsung C&T, Basics आणि Arabtec या तीन कंपन्यांनी बुर्ज खलिफा बांधला आहे. Samsung C&T ही दक्षिण कोरियन कंपनी आहे. ही कंपनी प्रगत अभियांत्रिकी क्षमतांसाठी ओळखली जाते. टॉवरच्या डिझाइन आणि बांधकामात सॅमसंग C&T ने महत्त्वाची भूमिका बजावली. तर बेसिक्स ही बेल्जियन कंपनी आहे आणि तिने बुर्ज खलिफा बांधण्यासाठी आपली तांत्रिक कौशल्ये आणि संसाधने वापरली. तर अरबटेक ही संयुक्त अरब अमिरातीची कंपनी आहे. अरबटेकने बांधकाम प्रक्रियेत योगदान दिले आहे.