...अन् आमिर खान या पुरस्कार सोहळ्यात आला

बॉलिवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान पुरस्कार सोहळ्यांना जाणं टाळतो. पण शुक्रवारी एका पुरस्कार सोहळ्यात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. 

Updated: Sep 23, 2017, 01:21 PM IST
...अन् आमिर खान या पुरस्कार सोहळ्यात आला title=

मुंबई : बॉलिवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान पुरस्कार सोहळ्यांना जाणं टाळतो. पण शुक्रवारी एका पुरस्कार सोहळ्यात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. 

शुक्रवारी आमिर खान ‘जीक्यू मॅन ऑफ द इयर’या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. या प्रसंगी अभिनेता रणवीर सिंग सोबतचे काही फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.  

 

'THUG' life #gqawards

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

कानामध्ये रिंग आणि पिळदार मिशीतला आमिर आणि रणवीरचा सेल्फी फारच कूल आहे. या फोटोखाली त्याने  ‘ठग्स लाइफ #gqawards’असे कॅप्शन लिहले आहे.  

‘जीक्यू मॅन ऑफ द इयर’या पुरस्कार सोहळ्यात आमिरला ‘क्रिएटिव्ह मॅव्हरिक' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर रणवीर सिंगला एण्टरटेनर ऑफ द इयर’हा पुरस्कार मिळाला. 
बॉलिवूडच्या अनेक स्टार कलाकारांनी 'जीक्यू' अ‍ॅवॉर्डला हजेरी लावली होती. 

जीक्यू' अ‍ॅवॉर्डसचे इतर मानकरी 

 अनुष्का शर्मा -‘वूमन ऑफ द इयर’
 राजकुमार राव -‘अॅक्टर ऑफ द इयर’
 कोंकणा सेन शर्मा -‘एक्सलेन्स इन डायरेक्टर अॅण्ड अॅक्टिंग’
 राहुल बोस -‘एजंट ऑफ सोशल चेंज’
 श्रीदेवी -‘एक्सलेन्स इन अॅक्टिंग’
 करण जोहर -‘प्रॉड्युसर ऑफ द इयर’
 इरफान खान ‘आउटस्टॅण्डिंग अचिव्हमेंट’ 
 सिद्धार्थ मल्होत्रा -‘मोस्ट स्टायलिश मॅन’