मुंबई : आजच्या काळात नोकरी मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण यानंतरही नोकरी मिळाली नाही तर किती मानसिक त्रास सहन करावा लागतो हे बेरोजगारांनाच माहित आहे. नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या अशाच एका तरुणाची अनोखी कहाणी समोर आली आहे. या तरुणाने नोकरीसाठी चक्क 300 ठिकाणी अर्ज केले. पण एकाही जागेवरुन त्याला नोकरीची ऑफर मिळाली नाही.
अखेर नोकरी मिळवण्यासाठी या तरुणाने एक अनोखा मार्ग शोधला. त्याने काढलेल्या उपायाची चर्चा संपूर्ण शहरात झाली.
ही घटना उत्तर आयर्लंडची आहे. 24 वर्षीय ख्रिस हार्किन सप्टेंबर 2019 पासून नोकरीच्या शोधात होता. क्रिस पदवीनंतर नोकरीसाठी भटकत आहे. पण 300 ठिकाणी अर्ज करूनही त्याला नोकरी मिळाली नाही. म्हणून ख्रिसने नोकरीसाठी चक्क मोठ मोठे फलकच लावले. यात त्याने खूप पैसा खर्च केला.
स्वत:चे फोटो असलेले फलक त्याने शहरभर लावले. या फलकावर लिहिलं होतं Please Hire Me इतकंच नाही तर त्याने यात तीन मुद्देही लिहिले. यामध्ये त्यांनी सांगितले की तो पदवीधर आहेत, अनुभवी लेखक आहेत आणि कंटेन्ट क्रिएटर देखील आहे.
आता इतकं करुन प्रत्येकाल प्रश्न पडला असेल की त्याला नोकरी मिळाली की नाही. पण अद्याप ख्रिसला नोकरी मिळालेली नाही. त्यातच त्याने मोठाले फलक लावण्यासाठी अमाप खर्चही केला.