जगातल्या सर्वात वृद्ध माणसाचं निधन

जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाजो नोनाका यांचं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं.

Updated: Jan 20, 2019, 10:26 PM IST
जगातल्या सर्वात वृद्ध माणसाचं निधन title=

ओशोरे : जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाजो नोनाका यांचं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ११३ वर्षांचे होते. जपानमधील ओशोरे येथे ते राहात होते. मसाजो यांचा जन्म २५ जुलै १९०५ रोजी झाला होता. २०१८मध्ये मसाजो यांनी आपल्या वयाची ११२ वर्षे आणि २५९ दिवस पूर्ण केले आणि त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं दिलं होतं. मसाजो यांना गोड पदार्थ खायला आवडत होतं. त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्यदेखील गोड खाणं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

त्यांचे कुटुंबीय गेल्या चार पिढ्यांपासून हॉट स्प्रिंग इन चालवतं. मसाजो यांना सात भावंडे, पत्नी आणि पाच मुलं होती. यातलं एक मुल सोडून इतर सगळ्यांचं याआधीच निधन झालं आहे. मसाजो यांना रविवारी झोपेत नैसर्गिक मृत्यू आला. मसाजो यांच्या नातीनं पाहिलं तेव्हा त्यांचा श्वास थांबला होता. यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आलं असता त्यांनी मसाजोंना मृत घोषित केलं.