विमानात Flight Mode वर का ठेवतात फोन? पायलटनं सांगितलं खरं कारण

Why use Airplane Mode in Flight : विमानात प्रवास करताना फोन Flight Mode वर ठेवण्याचं कारण आलं समोर... 

दिक्षा पाटील | Updated: Dec 11, 2024, 06:45 PM IST
विमानात Flight Mode वर का ठेवतात फोन? पायलटनं सांगितलं खरं कारण title=
(Photo Credit : Freepik)

Why use Airplane Mode in Flight : तुम्ही कधी ना कधी विमानानं प्रवास केला असेल आणि एकदा तुम्ही फ्लाईट बोर्ड केल्यानंतर कधीही एअर होस्टस आणि पायलट तुम्हाला फोन हा फ्लाईट मोडवर ठेवायला सांगतात. पण तुम्ही कधी ना कधी प्रश्न पडला असेल ना की विमानानं प्रवास करत असताना कधीही फोन हा फ्लाईट मोडवर ठेवायला का सांगतात? अनेकांना वाटतं की वरती रेंज तर येत नाही मग फोन का म्हणून फ्लाईटमोडवर ठेवायचा. कुठे काय कशाला फोन फ्लाईटमोडवर ठेवण्याची गरज आहे. तर आज आपण त्याचंच उत्तर जाणून घेणार आहोत. 

आता सगळ्या प्रश्नांचं उत्तरचं एका पायलटनं दिलं आहे. त्यांनी ही सगळी माहिती देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. @perchpoint या नावानं ओळखला जाणाऱ्या पायलटनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यानं विमानात फोन फ्लाईट मोडवर ठेवण्याच कारण सांगितलं आहे. तो म्हणाला फोनमध्ये असलेल्या फ्लाईट मोड किंवा एरोप्लेन बटन उगीच नाही. त्याशिवाय अनेक लोकं फ्लाईट बोर्ड केल्यावर फोन फ्लाईट मोडवर ठेवतात. महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विमान क्रॅश होईल किंवा ऑनबोर्ड सिस्टममध्ये काही गडबड होत नाही. पण यामुळे दुसरी समस्या होते या विषयी त्या पायलटनं सांगितलं आहे. 

काय आहे कारण?

अनेक यात्री हे अनेकदा फोन एरोप्लेन मोडवर किंवा फ्लाईट मोडवर ठेवायला विसरतात. त्यामुळे पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरमध्ये रेडियो संचारमध्ये अडचण येण्याची शक्यता असते. पायलटनं सांगितलं की जर विमानात 70, 80 किंवा 150 प्रवासी असतील आणि त्यांच्यापैकी 3-4 लोकांचे फोन हे रेडियो टॉवरशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतील, तर तो रेडियो वेव्ह्स पाठवतो. तर याच रेडियो वेव्हसमध्ये पायलटच्या हेडसेटशी हस्तक्षेप करु शकतात. 

हेही वाचा : 80 हजार कमावतो, नो बॉस-नो मॅनेजर... बाइक ड्रायव्हरनं सांगितलेली गोष्ट ऐकताच बसेल धक्का

पायलटनं त्याचे अनुभव सांगत या गोष्टीचा खुलासा केला की नुकताच एकदा टेकऑफ करताना जेव्हा त्याच्या हेटसेटचा वापर करत मिळणाऱ्या डायरेक्शनकडे लक्ष देत होतो. तेव्हा त्याला रेडियो इंटरफेअरेंसची जाणीव झाली. त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की जसे त्यांच्या कानाच्या जवळ काही मच्छर भिनभिनत असतील. त्यानं सांगितलं की हा काही जगाचा अंत नाही, पण याची समस्या तेव्हा होते जेव्हा तुम्ही फ्लाय करत असताना मिळणाऱ्या डायरेक्शन मिळून घेण्याचा प्रयत्न करत असता आणि तुम्हाला ते नीट ऐकू येत नाहीत.