'या' कारणामुळे एलीयन पृथ्वीवर येत नाहीत; व्हायरल पोस्टमध्ये खळळजनक दावा

एलियन मानवाशी संपर्क साधत असल्याचा दावा केला जातो. मात्र, एलियन पृथ्वीवर का येत नाही याबाबत एक अतंत्य खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 9, 2024, 09:51 PM IST
'या' कारणामुळे एलीयन पृथ्वीवर येत नाहीत; व्हायरल पोस्टमध्ये खळळजनक दावा title=

Aliens might be living with Humans :  एलियन खरचं अस्तित्वात आहे का? या दाव्यावर नेहमीच चर्चा होत असते. तर, एलियन मानवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा देखील नेमहीच केला जातो. यातच आता एलीयन पृथ्वीवर येत नाहीत याबाबत भलताच दावा करण्यात आला आहे. एका व्हायरल पोस्टमध्ये हा खळळजनक दावा करण्यात आला आहे. 

हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या सादर केलेल्या रिसर्च पेपरमध्ये एलिय हे परग्रहावर नाही तर पृथ्वीवरच मानवासोबत छुप्या पद्धतीने राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, एलियन परग्रहावर राहूनच पृथ्वीवरील मानवावर लक्ष ठेवत असल्याचाही दावा केला जातो. सोशल मिडियावर एलियनबाबतचे अनेक दावे व्हायरल होतात. या दाव्यांसोबतच आता एक विचित्र दावा करण्यात आला आहे तो म्हणजे एलियन पृथ्वीवर का येत नाही. या दाव्यात  एलीयन पृथ्वीवर का येत नाहीत याचे कारण सांगण्यात आले आहे. या अनोख्या दाव्याची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर खूप चर्चा होत आहे.

Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @Blit_Blitt99 नावाच्या युजरने एलियन बाबत अत्यंत विचित्र दावा केला आहे. पृथ्वीभोवती चहुबाजूने एक विशिष्ट प्रकारचे आवरण आहे. या आवरण ओलांडून पृथ्वीच्या कक्षात प्रवेश करण्याची एलियनला परवानही नाही असा दावा @Blit_Blitt99 नावाच्या युजरने आपल्या पोस्ट मध्ये केला आहे. यामुळेच एलियन पृथ्वीवर येत नसल्याचे युजरने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. 

या दाव्याची सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे. अनेकांनी हा दावा हास्यास्पद असल्याची कमेंट केली आहे. तर अनेकांनी हा दावा खरा असल्याचे सांगत याची पुष्टी करणारे पुरावे देण्याचा प्रयत्न केला आहे. नासाच्या बैठकीत  पृथ्वीभोवती असलेले विशिष्ट आवारण अर्थात ऑर्ब्सची चर्चा केली जाते. हे ऑर्ब्स म्हणजे वैश्विक रक्षा नेटवर्क असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी डेलोरेस कॅनन यांच्या कस्टोडियन्स यांच्या पुस्तकाचा देखील संदर्भ देण्यात आला आहे. या पुस्तकात एलिनचे अस्तित्व तसेच UFO याबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत.