मुंबई : सोशल मीडियावर रातो-रात प्रसिद्ध होणाऱ्या लोकांची तशी जगात कमी नाही. असे अनेक लोकं आहेत, जे त्यांच्या कामामुळे, गाण्यामुळे किंवा त्यांच्या युनीक क्वालीटींमुळे सोशल मीडियावर ओळखले जात आहे. अशात आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. पाकिस्तानातील कुल्फी विकणारा व्यक्ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. परंतु तो व्यक्ती एक नाही तर, चक्क दोन कारणांमुळे प्रसिद्ध झाला आहे. याचे एक कारण म्हणजे त्याचा आवाज आणि त्याची कुल्फी विकण्याची पद्धत. तर दुसरी म्हणजे त्याचा लूक.
शेहजाद रॉय नावाच्या पाकिस्तानी गायकाने पाकिस्तानमधील एका कुल्फी विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ त्याच्या ट्वीटर अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. कुलफी विकणारा हा व्यक्ती कुल्फी विकताना गाणे गात आहे आणि लोकांना त्याच्याकडे आकर्षीत करत आहेत. तो ज्या पद्धतीने ताल सुर लाऊन गाणे गात कुल्फी विकत आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे.
त्या व्यक्तीचा आवाज पाकिस्तानी गायक शेहजाद रॉयलाही आवडला आणि त्याने या कुल्फी विकणाऱ्या व्यक्तीचे कौतुक देखील केले आहे.
Wah. Qulfi walay bhai, Kya baat ha کھاۓ بغیر مزا آ گیا pic.twitter.com/YJeimzhboJ
— Shehzad Roy (@ShehzadRoy) June 10, 2021
परंतु हा व्हिडीओ पाहिल्यानेतर बहुतेक लोकांना तो अमेरिकेचे माजी राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वाटत आहे. लोकं त्या व्हिडीओवर डोनाल्ड ट्रम्पचा 'लूक अ लाईक' म्हणून या व्यक्तीची चर्चा करत आहेत.
ज्यामुळे लोकं या पोस्टवर कमेंट आणि शेअरसचा पाऊस पाडत आहेत. काही लोकांनी तर ट्रम्प यांच्यावर कुल्फी विकण्याची वेळ आली का? असे खोचक कमेंट्स देखील केले आहेत. तर अनेकांनी या व्यक्तीच्या आवाजाची प्रशंसा केली आहे.