मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एका शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचं मोजमाप करणं अशक्यच... याचीच प्रचिती एका उडत्या विमानात पाहायला मिळाली. या विमानाच्या पायलटनं आपल्या शिक्षकांना सरप्राईज दिलं... आणि शिक्षकांसहीत उपस्थितांच्या डोळ्यांत नकळत अश्रू उभे राहिले.
पत्रकार एहतिशाम उल हक यांनी या भावूक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे शेअर केलाय. 'तुर्की एअरलाईन्सच्या पायलटनं आपल्याच विमानातून प्रवास करणाऱ्या आपल्या शाळेतील शिक्षकांचे आभार मानले. हाच आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांप्रती मनाला भिडणारा आणि खराखुरा सन्मान आहे' असं त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलंय.
Turkish Airlines pilot thanks his school teacher who was on board the flight. Very moving and shows the ultimate respect to the educators who shape our lives. pic.twitter.com/loEvkLQh3m
— Ihtisham ul Haq (@iihtishamm) November 28, 2018
आपले शिक्षक याच विमानातून प्रवास करत असल्याचं समजल्यानंतर पायलटनं त्यांना एक खास सरप्राईज दिलं. ही घोषणा केबिनमधून करताना विमानाचा केबिन क्रू फुलांचा बुके घेऊन शिक्षकांसमोर दाखल झाले... या अनपेक्षित सरप्राईजमुळे शिक्षकदेखील हळवे झाले... आणि त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
पायलट आणि क्रू मेम्बर्सचा शिक्षकांप्रती हा भाव पाहून विमानातील सगळेच प्रवासी भावूक झाले... आणि त्यांनी या क्षणाला, आदर सत्काराला टाळ्या वाजवून दाद दिली.