पुरुष असूनही 18 वर्षे पत्नी बनून राहिला, मुलगाही झाला! चीनी गुप्तहेराची shocking कहाणी

जगात गुप्तहेर एकापेक्षा एक कथा आहेत. या हेरांवर अनेक चित्रपट देखील बनले आहेत. हेरगिरीला देशभक्ती मानत हे गुप्तहेर कोणताही धोका पत्करायला तयार होतात. अशीच चीनच्या गुप्तहेराची ही कहाणी आहे. हा गुप्तहेर 18 वर्षे एका महिला म्हणून वावरला. त्याने लग्न केले आणि त्याला मुलगा झाला. अखेरीस त्याचे सत्य जगासमोर आले. 

वनिता कांबळे | Updated: Jul 18, 2023, 10:35 PM IST
पुरुष असूनही 18 वर्षे पत्नी बनून राहिला, मुलगाही झाला! चीनी गुप्तहेराची shocking कहाणी   title=

Seema Haider case: पाकिस्तानी सीमा हैदर तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात पोहोचली. सीमा पाकिस्तानी हेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यूपी ATSने सीमाला ताब्यात घेतले आहे. सीमा हैदर प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली असतानाच एका  गुप्तहेराची शॉकिंग कहाणी चांगलीच चर्चेत आली आहे. चीनच्या गुप्तहेराची ही कहाणी आहे. पुरुष असूनही तो 18 वर्षे पत्नी बनून राहिला. त्याला मुलगा देखील झाला. अखेरीस त्याची गुप्तहेरी उघडकीस आली. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल झाला.

चीनच्या गुप्तहेराची थक्क करणारी कहाणी

1964 या वर्षातील ही कहाणी आहे. फ्रान्समधील रहिवासी असलेल्या बर्नार्डा बार्सिकॉटची पहिली पोस्टिंग चीनमधील बीजिंग येथील फ्रेंच दूतावासात झाली होती. येथेच बर्नार्डा याची ओळख चीनच्या या गुप्तहेराशी झाली. काही दिवसांत या दोघांची चांगली मैत्री झाली. मात्र, अचानक या चीनी गुप्तहेराने बर्नार्डा याच्याशी संपर्क बंद केला. यानंतर बर्नार्डा त्याचा शोध घेत त्याच्या घरापर्यंत पोहचला. यावेळी बर्नार्डा याला या चीनी हेराने एक विचित्र गोष्ट सांगितली. आपण पुरुष नसून स्त्री असल्याचे या चीनी हेराने बर्नार्डा याला सांगितले. माझ्या जन्माच्या वेळी आजीने माझा वडिलांना मुलगा झाला तर तुझं दुसरं लग्न लावून देईल अशी विचित्र अट घातली होती. यामुळे माझ्या आई वडिलांनी मी मुलगा असल्याचे माझ्या आजीला सांगितले. यानंतर मला मुलगा असल्यासारखेच वागवण्यात आले. मात्र, मी मोठा झाल्यावरही मुलगा म्हणूनच वावरत असल्याचे चीनी गुप्तहेराने बर्नार्डा याला सांगितले. बर्नार्डा याने चीनी गुप्तहेराला लग्नाची मागणी घातली. दोघांनी लग्न केले. पण, सत्य दोघांनी लपवून ठेवले. यानंतर चीनी गुप्तहेराने त्याचे नाव  शी पी पू असे असल्याचे बर्नार्डा याला सांगितले.

18 वर्षानंतर सत्य आले समोर

शी पी पू सह विवाह केल्यानंतर  बर्नार्डचा चीनमधील कार्यकाळ संपला होता. पुढच्या पोस्टिंगसाठी त्याला मंगोलियाला जायचे होते.  यादरम्यान, शी पी पू याने आपण गर्भवती असल्याचे बर्नार्ड याला सांगितले. यानंतर शी पी पू याने  मुलगा झाल्याचे बर्नार्ड याला सांगितले. यानंतर पुन्हा एकदा बर्नार्ड याची चीनमध्ये पोस्टिंग झाली. चीनमध्ये आल्यानंतर बर्नार्ड याने शी पी पू याच्याशी संपर्क साधत मुलाला पाहण्याची आणि एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, शी पी पू याने बर्नार्ड याला मुलाचा फोटो दाखवला. तसेच एकत्र राहणे किंवा देश सोडून जाणे अशक्य असल्याचे सांगितले. दरम्यान, बर्नार्ड याने त्याच्या संपर्कात असलेल्या एका चीनी अधिकाऱ्याला सर्व सांगत मदत मागितली. मात्र, याच्या बदल्यात त्याने बर्नार्ड याच्याकडे फ्रान्समधील गुप्त माहिती मागितली. त्याने चीन सरकारला किमान 500 गुप्तचर कागदपत्रे पाठवली होती. यामुळे बर्नार्ड याच्यावर सरकारला संशय आला होता. दरम्यान,  बर्नार्ड  आणि शी पी पू यांची पॅरिस येथे एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी पॅरिसच्या सुरक्षा यंत्रणांनी दोघांना ताब्यात घेतले. यावेळी शी पी पू हा स्त्री नसून पुरुषच असल्याचे बर्नार्ड याला समजले. शी पी पू याला मुलगाही झाला नव्हता. शी पी पू याने चीन सरकारच्या मदतीने बर्नाडा याला आपल्या जाळ्यात फ्रान्सची हेरगिरी केल्याचे उघडकीस आले. 

स्त्री म्हणून कसा वावरला

पुरुष असून शी पी पू  बर्नाडा याच्यासमोर स्त्री म्हणून कसा वावरला याचा उलगडा देखील तपासात झाला. शरीराच्या काही भागात फिमेल हार्मोन्स जास्त असतात, त्यामुळे छाती थोडीशी वर येते. दाढी-मिशी येत नाही. यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. पुरुषाचे गुप्तांग लपवून महिलेला गुप्तांग जाणवण्यात शी पी पू माहीर होता. या गोष्टीला वैद्यकीय भाषेत टकिंग म्हणतात.