School Bus Video: नुकतीच मुंबईतील (mumbai) अंबरनाथमधील (Ambernath) स्कूल बसला झालेला अपघात ताजा असताना सोशल मीडियावर असाच एक स्कूल बसचा व्हिडीओ (School Bus Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. हृदयाचे ठोके चुकविणारा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. तर तुमची मुलं ही स्कूलबसमध्ये प्रवास करत असतील तर पहिले हा व्हिडीओ पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला स्कूलबस चालकाने (Female school bus driver) बस थांबवली आणि एक चिमुरडी (little girl) खाली उतरली. पण ती पूर्णपणे बसच्या बाहेर जात होती की, बसचे दरवाजे लागले आणि त्या चिमुरडीची स्कूल बॅग (School bag) त्या दारात अडकली. त्यानंतर जे काही झालं ते पाहून अंगावर काटा येतो.
बस चालकाला काही लक्षात आलं नाही आणि तिने गाडी सुरु केली...त्यामुळे ही चिमुरडी 1KM फरफटत गेली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्कूल बस ड्रायव्हरचं जे घडतं आहे त्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष जातं नाही. त्यामुळे ती भरधाव वेगाने बस चालवत राहते. हा सर्व प्रकार बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) कैद झाला. म्हणून ही घटना समोर आली. (school bus driver dragged the girl for 1KM Shocking Video)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बस ड्रायव्हर आणि मागे उभ्या असलेल्या व्यक्तीलाही हे सगळं दिसलं कसं नाही. गाडी वेगात सुरू झाली आणि मुलगी गेटवर लटकत राहिली. काही अंतरावर गेल्यावर चालकाचा त्याच्याकडे पाहिले असता मुलगी गेटवर अडकल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने लगेच गाडी थांबवली आणि गेट उघडलं. या व्हिडीओने इंटरनेट वापरकर्त्यांना आश्चर्यचकित केलं आहे.
HOLY SHIT.
The little girl is miraculously fine, the bus driver has been fired. pic.twitter.com/uuijsrNn2U— Dean Blundell (@ItsDeanBlundell) September 23, 2022
एका यूजरने लिहिले की, 'हे पाहणे खूप कठीण होते. मला भयानक वाटतंय.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'ओएमजी, हे पाहून मी माझा श्वास सोडला.'
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना केंटकी (Kentucky), यूएसमध्ये (US) 2015 मध्ये घडली होती. घटनेचा तपास सुरु असतानाही ही क्लिप गेल्या वर्षीच प्रसिद्ध झाली होती. घटनेच्या वेळी मुलगी अवघ्या सहा वर्षांची होती आणि जेफरसन काउंटी स्कूल बसमधून उतरत होती. तिला गंभीर मज्जातंतूचं नुकसान झालं आणि PTSD 9 पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा सामना करावा लागला होता.