नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin ने पूर्व युक्रेनमधून वेगळे झालेल्या दोन प्रातांत स्वतंत्र देशाची मान्यता दिली आहे. तसेच युक्रेनने म्हटलं आहे की, तो कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही तसेच घाबरणार देखील नाही.
युक्रेनशी असलेल्या तणावादरम्यान रशियानं मोठं पाऊल उचलंय, ज्यामुळे आता हा वाद गंभीर स्वरूप घेऊ शकतो अशी शक्यता आहे. युक्रेनपासून वेगळे झालेले देश म्हणजे डोनेत्स्क (Donetsk) आणि लुहांस्क (Luhansk)होय. पुतीन यांनी आपल्या संबोधनात युक्रेन आणि अमेरिकेवर टीका करताना, युक्रेन अमेरिकेच्या हातातली बाहुली झाल्याचा आरोप केला आहे.
सुरक्षा परिषदेच्या बेठकीनंतर व्लादिमीर पुतीन यांनी या दोन्ही देशांच्या स्वायत्तेची घोषणा केली. दरम्यान, या देशांना रशियाचे संरक्षण असणार असल्याने रशियाचे सैन्य पाठवण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. राष्टाध्यक्ष पुतीन यांनी या दोन्ही देशांच्या स्वायत्तेला मान्यता देणाऱ्या आदेशावर हस्ताक्षर केले आहे.
रशियाच्या या निर्णयामुळे जगातील दोन्ही महासत्ता म्हणजेच अमेरिका आणि रशियात मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.