World Map : भटकंतीची आवड अनेकांनाच असते आणि मग याच भटकंतीच्या जोरावर काही नवी ठिकाणं शोधली जातात. प्रस्थापित ठिकाणांविषयीची माहिती गोळा केली जाते. अशाच माहितीतील एक कमाल संदर्भ आपण इथं जाणून घेणार आहोत. वर्षानुवर्षांपासून अमेरिका आणि रशिया ही दोन राष्ट्र जागतिक स्तरावर महासत्ता असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं. जगाच्या नकाशावर अनेकदा ही दोन राष्ट्र अधोरेखित करण्यात आली.
राजकीय पातळीवरी संबंध असो किंव आणखी काही कारणं, हे दोन देश या न त्या कारणानं प्रकाशझोतात राहिले. जगाच्या नकाशातील या देशांचं स्थान पाहिलं असता ही दोन्ही राष्ट्र एकमेकांपासून बरीच दूर असल्याचं लक्षात येतं. पण, प्रत्यक्षात मात्र पृथ्वीचा वर्तुळाकार लक्षात घेतल्यास वेगळीच बाब समोर येते.
सपाट पृष्ठावर ठेवलेला हाच नकाशा प्रतिकात्मक पृथ्वीच्या वर्तुळावर लावल्यास या आकारानुसार रशिया आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्र एकमेकांपासून अगदीच जवळ असल्याचं लक्षात येतं. त्यामुळं आजवर जगाचा नकाशा आपल्याला ज्या पद्धतीनं शिकवला गेला ती पद्धतच काहीशी चुकीची होती हेच दाखवून देणारे काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
प्रत्यक्षात एखाद्या सपाट पृष्ठावर दाखवल्या जाणाऱ्या जगाच्या नकाशामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये बरंच अंतर पाहायला मिळतं. हे अंतर साधारण 8800 किमी इतकं असल्याचं सांगण्यात येतं. प्रत्यक्षात मात्र हे अंतर अवघ्या 4 किमी इतकच आहे. नकाशामध्ये विविध देशांमध्ये मोठं अंतर दिसत असलं तरीही पृथ्वी वर्तुळाकार आहे ही बाब मात्र इथं विसरून चालणार नाही. त्यामुळं समोरून पाहिल्यास या दोन्ही देशांमध्ये जास्त अंतर दिसून येतं. पण, उत्तरेकडे मात्र या दोन्ही देशांमध्ये दोन बेटं असून, त्यांना 'लिटील डायोमिड आणि 'बिग डायोमिड' म्हणूनही ओळखलं जातं.
लिटील डायोमिड हे बेट अमेरिकेत असून, बिग डायोमिड हा रशियाचा भाग आहे. या दोन्ही बेटांमध्ये फक्त 2.5 मैलांचं अंतर आहे. अमेरिका आणि रशियामध्ये फक्त 4 किमी इतकं अंतर असलं तरीही त्यांच्यामधी वेळमर्यादेत तब्बल 21 तासांचा फरक आहे. यामागचं कारण म्हणजे या दोन्ही बेटांमधून जाणारी एक आंतरराष्ट्रीय डेटलाईन. या एका फरकामुळं ही दोन्ही बेटं 'टुमोरो आयलंड' आणि 'यस्टरडे आयलंड' म्हणूनही ओळखली जातात. आहे की नाही या देशांमधील अंतराबाबतची ही कमाल गोष्ट?