पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा आळवला काश्मीरवरचा राग; उईगर मुस्लीमांवरील अत्याचाराबाबत मात्र मौन...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवरचा राग  आळवला आहे. 

Updated: Jun 22, 2021, 09:10 AM IST
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा आळवला काश्मीरवरचा राग; उईगर मुस्लीमांवरील अत्याचाराबाबत मात्र मौन... title=

मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवरचा राग  आळवला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मते काश्मीरचा प्रश्न सुटल्यास पाकिस्तानला अण्वस्त्रांची गरज भासणार नाही. त्याचवेळी इम्रान खान म्हणाले की, जर अमेरिकेने मध्यस्ती केली तर काश्मीरचा प्रश्न सुटू शकेल.  इम्रान खान यांनी अमेरिकेतील न्यूज वेबसाइट Axios ला दिलेल्या मुलाखतीत काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली. 
 
इम्रान खान यावेळी भारत आणि पाकिस्ताच्या तणावपूर्ण संबंधाचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, '5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरबाबत भारतचा एकतर्फी निर्णय  आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि यूएन सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे भारताने उल्लंघन केले आहे. भारताच्या या निर्णयामुळे आम्हाला व्यवसाय करण्यासाठा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ' असं खान म्हणाले.

मुलाखती दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत कोणत्या मुद्द्यावर चर्चा कराल असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, 'अमेरिकेवर मोठी जबाबदारी आहे, हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. काश्मीर एक विवादीत क्षेत्र आहे. काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेता यावा. त्यासाठी जर अमेरिकेने यामध्ये मध्यस्ती केली तर प्रश्न  मार्गी लागतील  '

इम्रान खान पुढे म्हणाले, 'जोपर्यंत भारत काश्मीरबाबत निर्णय परत घेत नाही तोपर्यंत आमचे संबंध उत्तम होवू शकत नाही.' याच दरम्यान इम्रान खान यांनी जेव्हा चीनमधील उईगर मुस्लीमांवरील अत्याचाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मात्र त्यांनी मौन बाळगलं.