जगातील 7 आश्चर्यांपैकी एके ठिकाणी रहस्यमयीरित्या सापडले 12 सांगाडे; याचा अर्थ समजायचा तरी काय?

संपूर्ण जगासाठी आश्चर्य ठरलेल्या जवळपास 7 वास्तू असून, यापैकीच एके ठिकाणी अशी गोष्ट जगासमोर आली आहे की पाहणारेही हैराण आहेत.   

Updated: Oct 17, 2024, 02:48 PM IST
जगातील 7 आश्चर्यांपैकी एके ठिकाणी रहस्यमयीरित्या सापडले 12 सांगाडे; याचा अर्थ समजायचा तरी काय? title=
mysterious skeletons found under Al Khazneh Petra Jordan know details

Al-Khazneh Petra Jordan: पुरातत्वं विभाग आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी सातत्यानं काही अशा रहस्यांची उकल केली आहे, की गतकाळातील जीवनशैलीपासून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. जागतिक स्तरावर होणाऱ्या या निरीक्षण आणि अध्ययनातून आजवर कैक अशक्य गोष्टी समोर आल्या आणि याचीच मदत मानवाच्या उत्क्रांतीची पाळमुळं शोधण्यात झाली. आतासुद्धा असाच एक रहस्यमयी खुलासा झाला असून, जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या पेट्रा जॉर्डन इथं हे संशोधन झाल्याचं लक्षात आल, जिथं एक कबर आढळून आली. 

अधिकृत माहितीनुसार ही कबर जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या ट्रेजरी इमारतीच्या अल खजनेह इथं सापडली. हादरवणाऱ्या या निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार 12 सांगाडे आणि त्यांचे अवशेष हाती लागले. पेट्रा हे एक शहर असून, वाळवंटातील दऱ्याखोऱ्यांमध्ये खडकांवर हातांनी कोरीवकाम करून हे शहर वसवण्यात आल्याचे संदर्भ आढळतात. 'राकेमे' अशी या शहराची स्थानिकांमध्ये असणारी ओळख. 

व्यापाराच्या निमित्तानं स्थलांतर करणाऱ्या आणि नाबातियन अरब समुदायानं साधारण ईसवीसन पूर्व पाचव्या शतकात हे शहर वसवल्याचं सांगितलं जातं. पेट्राच्या नजीकच्या भागात 9000 वर्षांपासून मानवी वावर आढळतो. याच पेट्रा शहराच्या पोटात नेमकं दडलंय काय, याविषयी संशोधन सुरू असतानाच अतिशय गूढरित्या दडलेली ही कबर समोर आली. 

 इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंडक्टिविटी आणि रिमोट स्कॅनिंग, ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडारच्या माध्यमातून या कबरीमध्ये नेमकं काय आहे याची माहितीमिळवण्याकत आली. ज्यावेळी कबरीची एकंदर संरचना पाहिली गेली तेव्हा इथं तातडीनं उत्खनन सुरु करण्यात आलं. 

हेसुद्धा वाचा : बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत

स्कॉटलंडमधील सेंट एंड्र्यूज यूनिवर्सिटीतील जियोफिजिसिस्ट रिचर्ड बेट्स यांच्या मते हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन असून, पेट्रा शहर कसं वसलं आणि नबातियन कोण होते याची उकल होण्यास मदत होणार आहे. इथं एक सांगाडा मातीच्या भांड्याला पकडून असल्याचं दिसून आलं, तर कबरीच्या भींती पहिल्या शतकाच्या मध्यापासून दुसऱ्या शतकादरम्यानच्या असल्याचं सांगितलं जात आहे.