क्या हो दाजीबा! मेहुणीच्या साखपुड्यानंतर दाजीबाची उघडली पोल, गर्भवती पत्नीला बसला धक्का

नवरी मुलीच्या साखरपुड्यानंतर चक्क एक व्यक्ती इतका रडला की सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा होत आहे. 

Updated: Jul 30, 2022, 03:30 PM IST
क्या हो दाजीबा!  मेहुणीच्या साखपुड्यानंतर दाजीबाची उघडली पोल, गर्भवती पत्नीला बसला धक्का title=

Trending News : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि तेवढ्याच हळवा क्षण असतो. मुलीचं लग्न हे आई-वडिलांसाठी हळवा क्षण असतो. आपली मुलगी दिल्या घरी सुखी राहावी, एवढीच त्यांची अपेक्षा असते. मुलीच्या लग्नात आई-वडिलांसोबत नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी असतं. पण सोशल मीडियावर एक घटना समोर आली आहे. ते ऐकून तुम्हाला आर्श्चय वाटेल. नवरी मुलीच्या साखरपुड्यानंतर चक्क एक व्यक्ती इतका रडला की सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा होत आहे. 

एका महिलेने सोशल मीडियाच्या Reddit च्या  u/ThrowRavin वर तिच्या बहिणीच्या साखरपुड्यानंतर तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं.  या पोस्टमध्ये ती म्हणते की, ''बहीण आणि तिच्यातील नातं खूप घट्ट होतं. मी माझ्या बहिणीला काय प्रॉटेक्ट केलं आहे.  मी माझ्या बहिणीसाठी कायम रोल मॉडल आहे.'' तिने या पोस्टमध्ये सांगितलं की, ''तिची बहीण कायम खाली जमिनीवर झोपायची आणि तिला पलंगावर झोपायला सांगायची. ती जेव्हा कॉलेजमध्ये जायची तेव्हा कधी कधी कॉलेजमधून पळून ती माझ्या घरी यायची.'' 

महिलने सांगितलं की, ''तिची बहिण एका व्यक्तीला डेट करत होती. ही गोष्ट तिच्या नवऱ्याला बिलकुल आवडतं नव्हती. एका दिवशी मी, माझा नवरा, माझी बहीण आणि तिचा बॉयफ्रेड जेवायला गेले होतो. त्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडने माझ्या बहिणीला प्रपोज केलं. त्यानंतर आम्ही घरी आल्यावर माझा नवरा ढसाढसा रडू लागला.''

ऐका दाजीबा!

हो, दाजीबा मेहुणीच्या साखरपुड्यानंतर ओक्साबोक्शी रडला. ''नवऱ्याला असं रडताना पाहून मला काही सुचलं नाही.  मी तिला रडण्याचे कारण विचारल्यावर मला धक्का बसला. माझ्या नवऱ्याने सांगितलं की, तो माझ्या बहिणीवर अनेक वर्षांपासून प्रेम करतो. पण मला माहिती आहे की हे चुकीचं आहे. तो पुढे म्हणाला की, तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तो आमच्या मुलाचा खूप चांगला बाप होऊन दाखवणार.''

''मी आता काय करु?''

''माझ्या नवऱ्याचं माझ्या बहिणीवर एकतर्फी प्रेम आहे. तर आता मला काय करावं हे कळतं नाही आहे. आता मी काय करु हा प्रश्न मला सतावत आहे. मी हे लग्न वाचवायला हवं का?'' असा प्रश्न तिने या पोस्टद्वारे विचारला आहे. तिच्या या पोस्टवर यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.