Man Win Lottery : दैव देत आणि कर्म नेत... अशी म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच प्रत्यक्ष घटना एका व्यक्तीसह घडली आहे. या व्यक्तीने 100 कोटींची लॉटरी जिंकली (Man Win Lottery). मात्र, तो व्यक्ती एका झटक्यात भिकारी झाला. जेवायलाही त्याच्याकडे पैसे उरले नाहीत. ब्रिटनमधील हा करोडपती व्यक्ती रोडपती झाला आहे. कंगाल होण्यामागे त्याचे कर्मचं कारणीभूत आहे.
श्रीमंत होण्याचे स्वप्न जवळपास सर्वच जण पाहत असतात. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बरेच जण श्रीमंत होतात. मात्र, अनेक जण असेही असतात ज्यांच्या नशिबात श्रीमंतीचा योग असतो. यामुळेच हे लोक कोणतीही मेहनत न घेता श्रीमंत होतात. लॉटरीच्या तिकीटामुळे यांचे नशीब पालटते. ब्रिटनमधील एका व्यक्तीला 100 कोटींची लॉटरी लागली. रातोरात हा व्यक्ती श्रीमंत झाला.
मॅकगिनेस असे या व्यक्तीचे नाव आहे. ब्रिटनमध्ये राहणारा मॅकगिनेस हा रुग्णालयात सामान पोहचवण्याचे काम करत होता. त्याला स्वप्नातही वाटले नव्हते की तो अचानक खूप श्रीमंत होईल. द सनच्या रिपोर्टनुसार, 1997 मध्ये जॉनला 100 कोटी रुपयांची लॉटरी लागली. लॉटरी लागल्यावर ऐवढ्या पैशांचे काय करायचे या विचारानेच तो वेडा झाला. पाण्यासारखा पैसा तो खर्च करु लागला. र्सिडीज, जग्वार, फेरारी आणि बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान आणि महागड्या कार त्याने खरेदी केल्या. राहण्यासाठी सुमारे 13 कोटींचा आलिशान बंगला घेतला आणि 5 कोटींचे सीफेसिंग अपार्टमेंटही घेतले.
मॅकगिनेस याला वाटले कितीही खर्च केला तरी पैसे संपणार नाहीत. लक्झरी अफेअरमध्ये त्याच्या कुटुंबावर आणि स्वतःवर सुमारे 30 कोटी रुपये खर्च केले. त्याच्याकडचे पैसे कधी संपले त्यालाच कळले नाही. त्याची अशी अवस्था झाली की जेवण खरेदी करण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नाहीत. लॉटरीतून मिळालेले सर्व पैसे त्याने ऐशोआरामावर उधळले.