जेरूसलम : काही वेळेस नोकरीत टिकून रहायचे म्हणजे तुम्हांला काही तडजोडी कराव्या लागतात. पण ईज्राईलमध्ये मात्र एका मंत्र्याने सुट्टीच्या दिवशी काम करावे लागल्याने पंतप्रधानांकडे राजीनामा पाठवल्याचे वृत्त आहे.
इज्राईल मीडियाच्या रिपोर्टनुसार, आरोग्यमंत्री याकोव लिजमन यांना एका रेल्वे प्रोजेक्टच्या कामासाठी सबथ दिवशी काम करावे लागल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
ज्युईश लॉ नुसार सबथ हा पवित्र काळ आहे. या दिवसामध्ये काम करण्याची पद्धत नाही. तसेच याकोव लिजमन हे एका रूढीवादी राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत.
लिजमन यांच्या म्हणण्यानुसार नॅशनल रेल लाईनचं अनावश्यक स्वरूपाचे काम त्यांच्याकडे शनिवारी देण्यात आले. यदूही इतिहासानुसार सैबथच्या दिवसाला असामान्य महत्त्व आहे.
नेतन्याहू हे इस्त्राईलचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडेच राजीनामा पाठवण्यात आला आहे. नेतन्याहूंना सत्तेमध्ये राहण्यासाठी लिजमनच्या पार्टीचे समर्थन गरजेचे आहे. या पक्षाने पाठिंबा काढल्यास सरकार संकटामध्ये येऊ शकते.