Iran Anti Hijab Protest: हिजाबच्या वादावर गेल्या काही दिवसांपासून इराणमधील (iran hijab protest) विविध शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. 16 सप्टेंबर रोजी महसा अमिनीचं पोलिस कोठडी निधन झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. हिजाबविरोधी सुरु असलेल्या निदर्शनांमुळे इराणमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 300 नागरिकांचं निधन झाल्याची माहिती रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एका जनरलने दिली आहे. मृतांचा आकडा थक्क करणारा आहे. (protest against hijab in iran)
इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड जनरल अमीराली हाजीजादेह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजाबच्या विरोधातील निदर्शनांमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक नागरिकांचं निधन झालं आहे. या धक्कादायक घटनेत फक्त महिला, पुरुषचं नाही तर, अनेक चिमुकल्यांनी देखील आपले प्राण गमावले आहेत. (iran protests 2022)
महर वृत्तसंस्थेनुसार, पोलीस कोठडीत महसा अमिनीच्या झालेल्या निधनानंतर देशातील प्रत्येक नागरिक प्रभावित झाला आहे. अशी माहीती गार्ड्सच्या एरोस्पेस विभागाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल अमीराली हाजीजादेह यांनी दिली आहे.
एवढंच नाहीतर, 'माझ्याकडे सध्याचा आकडेवारी नाही, पण लहान मुलांचा देखील या प्रकरणात निधन झालं आहे. आतापर्यंत देशात 300 अधिक नागरिकांनी हिजाबविरोधी निदर्शनांमध्ये आपले प्राण गमावले आहेत...' असं देखील ते म्हणाले. (iran women protest)
मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दिलेले माहिती
इराणी जनरल यांनी वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत मानवाधिकार कार्यकर्त्यांनी नोंदवल्या आकड्यांपेक्षा फार कमी आहे. (More than 300 citizens died in antihijab protests) जेव्हापासून निदर्शनं सुरु झाली तेव्हापासून आतापर्यंत 451 निदर्शक आणि 60 सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. शिवाय या प्रकरणी 18 हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (anti hijab protest iran)