वर्सो : एका तरूणीने आपल्या मैत्रीणीला रस्त्यावर चालताना सहज एक धक्का दिला, पण हा धक्का तिला जवळपास मृत्यूच्या जवळ घेऊन गेला होता. पोलंडमधील ही घटना असली, तरी अतिशय धक्कादायक आहे, फुटपाथवरून चालत जात असताना, तिच्या मैत्रीणीने तिला सहजच एक धक्का दिला, मात्र हे टायमिंग अतिशय चुकीचं होतं. कारण या धक्क्यानंतर ती रस्त्यावर पडली, आणि बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली ती आली की काय? असं वाटलं, पण.. सुदैवाने ती थोडक्यात बचावली.
एका कार ड्रायव्हरने हे दृश्य पाहिलं, बस ड्रायव्हरनेही पुढे जाऊन या घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी धक्का देणाऱ्या या १७ वर्षाच्या मुलीचं नाव जाहीर केलेलं नाही. पोलंडमधील तोहोजीडिझिचा गावात ही घटना घडली. मैत्रीणीला धक्का देणाऱ्या, या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. खरोखर या मागे काही कट असल्यास, आरोप सिद्ध झाल्यास या मुलीला १ वर्षांची जेल होण्याची शक्यता आहे.
या घटनेचं व्हीडीओ फुटेज स्थानिक पोलिसांनी रिलीज केलं आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर घटनेची तीव्रता लक्षात येते, तसेच कुणालाही सहज मारलेला धक्का मृत्यूच्या किती जवळ घेऊन जाणारा असतो, या विषयी ही जनजागृती होणार आहे.