वॉशिंग्टन : पाल किंवा झुरळाला अनेकजण प्रचंड घाबरतात हे तुम्ही आजपर्यंत पाहिलं किंवा अनुभवलं असेल. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
एक टीव्ही रिपोर्टर लाईव्ह देण्यासाठी कॅमे-यासमोर उभी असते. मात्र, त्याच दरम्यान असं काही घडतं की ज्यामुळे ही टीव्ही रिपोर्टर किंचाळण्यास सुरुवात करते.
लॉस एंजेलिसमधील केटीएलए न्यूज चॅनलची महिला रिपोर्टर लाईव्ह देण्यासाठी तयार होती. तिच्यासमोर कॅमेरा होता आणि हातात बूम होता. लाईव्ह सुरु होण्यापूर्वी तिच्या अंगावर एक झुरळ आले. या झुरळाला बघून ती जोरात किंचाळली.
यावेळी तिच्यासोबत असणारा तिचा पुरुष सहकारी मदतीसाठी पुढे आला. मात्र, तोपर्यंत त्या महिला रिपोर्टरने ते झुरळ झटकलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे.
Ahhhhh: Flying cockroach jumps on @mcdade_mb before her live shot on the @KTLA 5 News at 10p! #RoachBomb pic.twitter.com/ZjbC8NDMuv
— Marcus Wilson-Smith (@MarcusSmithKTLA) August 3, 2017
ते झुरळ आपल्या अंगावरुन झटकल्यानंतर या महिला रिपोर्टरला हसू आलं. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगावर खूप हसली आणि पून्हा लाईव्ह देण्यासाठी तयार झाली. तिचा सहकारी मार्कस विल्सन स्मिथ याने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.