Tea Stain Clean: अनेकांना चहा पिण्यची सवय असते. ऑफिसमधील कामाच्या ताणतणावातून मोकळीक मिळावी किंवा काम करण्यासाठी पुन्हा उत्साह यावा यासाठी अनेकजण चहा पितात. पण अनेक वेळा चहा पिताना त्याचे काही थेंब आपल्या कपड्यांवर पडतात. अशा परिस्थितीत कपड्यांवर चहाचे डाग पडतात. चहाचे डाग साफ करणं खूप कठीण आहे. जर तुमचे कपडे पांढर्या रंगाचे असतील तर त्रास आणखीचं वाढतो. पण घरी बसल्या काही युक्त्यांचा वापर करुन तुम्ही चहाचे डाग साफ करू शकता. (Do you know how to remove tea stains from white shirt cleaning use this tips)
पांढर्या शर्टवरील चहाचा डाग काढून टाकण्यासाठी, शर्ट थंड पाण्यात भिजवा आणि विशेषत: ज्या भागात कपड्यावर डाग आहे तो जास्त धार असलेल्या पाण्याच्या नळाखाली धूवा.
शर्ट पूर्णपणे भिजवून, डाग असलेल्या ठिकाणी कपडे धुण्याचा डिटर्जंट लावा आणि अर्धा तास ठेवा. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि तरीही शर्टचे डाग गेले नाहीत तर पुन्हा कोमट पाण्यात १५ मिनिटे भिजवा.
पांढऱ्या कपड्यांवरील चहाचे डाग काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी चहाचा डाग असलेल्या भागावर थोडासा बेकिंग सोडा लावा. 12 तास शर्टवर असचं राहू द्या. यामुळे शर्टावरील डाग शोषून घेतला जाईल यानंतर 12 तासाने तो शर्ट पाण्याने धुवा.
जर बेकिंग सोडा वापरूनही पांढऱ्या शर्टावरील डाग निघत नसेल तर तुम्ही डाग रिमूव्हर वापरू शकता. जेल, स्प्रे, पावडर आणि लिक्वीड स्वरूपात डाग रिमूव्हर बाजारात मिळतो. याने चहाचे हट्टी डाग काही मिनिटांत नाहीसे होतील.