नवी दिल्ली : डोकलामच्या बाबतीत भारत आणि चीन दोन्ही देश आपल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भारतीय सैनिकानंतर चीनी सैनिकांनी देखील या वादग्रस्त भागात तळ ठोकला आहे. दोन्ही सैन्याचे 300-300 जवान या जागेवर आहेत.
दोन्ही सैन्याच्या मध्ये 120 मीटरचं अंतर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नल स्तरीय अधिकारी दोन्ही सैन्याचं नेतृत्व करत. भारतीय सीमाभागात भारतीय सैनिकांनी तळ ठोकल्यानंतर चीनचं सैन्य देखील तेथे दाखल झालं आहे. १० हजार फूट उंचीवर असलेला या भागात सध्या तापमान देखील सहन करण्यासारखं आहे.
जमिनीवरुन भारतीय सैन्याला त्या उंच भागावर पुरवठा करण्यासाठी फक्त 8 ते 10 किलोमीटर जावं लागतं. तर चीनी सैन्याला त्या तळाला पोहचण्यासाठी ६० ते ७० किलोमीटर जावं लागतं. चीनचं लष्कर या भागात नसतं. पण या भागात त्यांचं नेहमी येणं जाणं असतं. पण या वादग्रस्त क्षेत्रात भारताचं लष्कर नेहमी असतं. डिसेंबरपर्यंत ते तेथे सहज राहू शकतात. सध्या आवश्यक असेल तेव्हा उपलब्ध राहण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत.