'बॉम्ब' वादळाचा फटका, नायगरा धबधबा गोठला!

अमेरिकेला बॉम्ब वादळाचा फटका बसलाय. या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झालीय.

Updated: Jan 6, 2018, 12:39 PM IST
'बॉम्ब' वादळाचा फटका, नायगरा धबधबा गोठला! title=

न्यूयॉर्क : अमेरिकेला बॉम्ब वादळाचा फटका बसलाय. या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झालीय.

या वादळात आत्तापर्यंत चार जणांचा बळी गेलाय. अमेरिकेच्या अनेक भआगात थंडीची लाट पसरली असून अनेक विमान उड्डाणं रद्द करण्यात आलीत तसंच शाळाही बंद ठेवण्यात आल्यात.

'Bomb Cyclone' batters eastern US; energy, power supply hit
बर्फ हटवण्याचा काम सुरू 

उत्तर न्यूयॉर्कमध्ये तापमान इतकं कमी झालंय की नायगरा धबधबाही गोठलाय. पूर्व अमेरिकेतील किनाऱ्यावर वीजपुरवठा बंद झालाय.

हा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ८८.५ किमी असून तापमान उणे २९ अंश सेल्सियस इतकं खाली गेलंय.