Baba Vanga Predictions 2025 : 2025 या वर्षाच्या आगमनासह चर्चेत आलेय ती प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याची भविष्यवाणी. 2025 ची सुरुवात महाभयंकर असेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा याने केली आहे. मात्र, 2025 वर्ष सुरु होण्याच्य 13 दिवस आधीच बाबा वेंगाने 2025 या वर्षाबाबत केलेली एक भविष्यवाणी खरी ठरली आहे. जाणून घेऊया ही भविष्यवाणी नेमकी काय आहे.
नेत्रहीन असलेल्या बाबा वेंगाने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा वेंगानं मृत्यूपूर्वी 5079 सालापर्यंतच्या भविष्यवाण्या केल्या आहेत. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते.
2022 या वर्षासाठी बाबा वेंगानं 6 भाकितं वर्तली होती. यातली दोन भाकितं खरी ठरली होती. बाबा वेंगानं रशिया आणि ऑस्ट्रेलियात पुराचं भाकित वर्तवलं होतं, ते खरं ठरलं. 2023 साली तिसरं महायुद्ध होऊ शकतं आणि या महायुद्धात महाविध्वंसक अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता वर्तवली होती. 2023 पासून सुरु झालेले रशिया आणि युक्रेनचे घनघोर युद्ध अद्याप शमलेले नाही. 2024 च्या संदर्भात भविष्यवाणी करताना बाबा वेंगा यांनी हवामानाशी संबंधित महत्त्वाची भविष्यवाणी केली होती. यानुसार या वर्षात उष्णतेचा कहर पहायला मिळाला. अमेरिकेला उष्णतेचा जबरदस्त तडाखा बसला. उष्णतेमुळे वॅक्स म्युझियममधील अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला. यानंतर आता 2025 या वर्षासाठी देखील चिंताजनक भविष्यवाणी वर्तवली आहे.
2025 या वर्षाची सुरुवात विनाशकारी असेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा याने केली आहे. बाबा वेंगा यांनी युरोपमध्ये मोठ्या संघर्ष होईल अशी भविष्यवाणी केली आहे. 2025 पर्यंत युरोप खंडातील बहुतांश लोकसंख्या नष्ट होईल. सध्याच्या भू-राजकीय तणावाचा भविष्यात गंभीर परिणाम पहायला मिळेल. 2043 पर्यंत युरोपात मुस्लिम राजवट लागू होईल अशी भविष्यवाणी देखील बाबा वेंगा याने केली आहे.
बाबा वेंगाची पहिली भविष्यवाणी 2025 वर्ष सुरु होण्याआधीच खरी ठरली. 2025 या वर्षात आरोग्य चिकित्सा क्षेत्रात मोठी क्रांती घडेल. जग वैज्ञानिकदृष्ट्या खूप प्रगती करेल. जीवघेण्या आजारांवरील आतापर्यंत समोर न आलेले उपचारपद्धतीचा शोध लागू शकतो. अल्झायमर आणि कॅन्सरसारखे जीवघेणे आजार बरे होऊ शकतात. 2025 वर्षात कर्करोगावरील प्रभावी लस विकसित होऊ शकते. असे बाकित बाबा वेंगाने केले. मात्र, 2025 वर्ष सुरु होण्याच्य 13 दिवस आधीच म्हणजेच 18 डिसेंबर 2024 रोजी बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली. कर्करोगावरील लस जगासमोर आली. रशियाने वैज्ञानिक शास्त्रातील चमत्कार करुन दाखवला आहे. रशियाने कर्करोगावरील लस विकसित केली आहे. 18 डिसेंबर 2024 रोजी रशियाने याची घोषणा केली. ही लस कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी असणार आहे.