कोलंबो : ईस्टरच्या दिवशी दोन समाजांमध्ये वाढलेल्या तणावामुळे श्रीलंकेत सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर अल्पसंख्याक मुस्लीम आणि बहुसंख्य सिंहलींमध्ये तणाव वाढला आहे. फेसबुकवर एका मुस्लीम दुकानदाराने टाकलेल्या पोस्टनंतर श्रीलंकेच्या चिलॉ भागात काही लोकांनी मशीद आणि मुस्लीम मालक असलेल्या दुकानांवर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही समाजामधील वाद वाढत गेला. यामुळे त्याभागात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून फेसबूक आणि वॉट्सअप बंद ठेवण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत नऊ आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. न्यझीलंडमधील मशीदीवरी हल्ल्याचा बदला म्हणून काही मुस्लीम दहशतवाद्यांनी श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामध्ये २६० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पसंख्याक मुस्लीम आणि बहुसंख्य सिंहलींमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मध्यरात्रीनंतर फेसबुक आणि व्हॉट्सअपवर बंदी घालण्यात आली आहे. रविवारी उशीरा मस्जिद आणि काही मुसलमान दुकानदारांवर हल्ला करण्यात आला. यामुळे या भागात कर्फ्यू लावण्यात आला होता.