Video : रशियातील युनिव्हर्सिटीमध्ये माथेफिरुचा गोळीबार, 8 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी

जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बिल्डिंगमधून उड्या मारल्या

Updated: Sep 20, 2021, 02:19 PM IST
Video : रशियातील युनिव्हर्सिटीमध्ये माथेफिरुचा गोळीबार, 8 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी

रशिया : रशियातील पर्म युनिव्हर्सिटीमध्ये आज एका बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे युनिव्हर्सिटीतले विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी  युनिव्हर्सिटीच्या खिडक्यांमधून खाली उड्या मारल्या.

रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नावख तैमूर बेकमानसरोव (Timur Bekmansurov) तो 18 वर्षांचा असून पोलिसांच्या गोळीबारात त्याचाही मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच युनिव्हर्सिटी व्यवस्थापनाने कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला कॅम्पसमधून बाहेर पडण्यासाठी किंवा शक्य असल्यास स्वतःला एका खोलीत बंद करण्यास सांगितलं. 

हल्लेखोराला ठार मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोर त्याच युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी होता, असा दावा केला जात आहे. हल्लेखोराने सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलं असून त्यात त्याने हल्ल्याचा हेतू स्पष्ट केला आहे.