नवी दिल्ली : नेपाळच्या औषधे रेग्युलेटरने बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीची ६ आयुर्वेदिक औषधांना परिक्षण केल्यानंतर नापास केलं आहे. ही औषधे परत घेऊन जाण्य़ास सांगितले आहे. औषधे प्रशासन विभागाने एका सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटलं की, उतराखंडमधील दिव्य फार्मसीमध्ये बनलेली ६ औषधे ही परिक्षणात नापास झाली आहे. सूक्ष्मजीव संबंधी परिक्षणामुळे जी औषधे निकृष्ठ दर्जाची आढळली. ज्यामध्ये पतंजलीचे आवळा चूर्ण, दिव्य गसार चूर्ण, बहुची चूर्ण, त्रिफळा चूर्ण, अगंधा आणि अद्वेय चूर्ण यांचा समावेश आहे.
कंपनीने म्हटलं बंदी नाही तर माल परत केला
विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, पंतजलीच्या या औषधांमध्ये रोगजनक बॅक्टेरिया आढळले आहेत. त्यामुळे याला न विकण्याचा किंवा इतरांना याबाबत सल्ला न देण्यास सांगितलं आहे. तर पतंजली आयुर्वेदच्या एका सूत्राचं म्हणणं आहे की, औषधांवर बंदी नसून फक्त एक काही माल चाचणी अयशस्वी झाल्याने परत पाठवला आहे.