मुंबई : अनेकदा लोक स्वच्छतेच्या नावाखाली Pubic hair शेव्ह टाकतात. काही स्त्रिया यासाठी रेझर वापरतात, तर काही बिकिनी वॅक्सच्या मदतीने केस काढतात. मात्र हे केस हे अनहायजेनिक नाहीत याची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या योनिमार्गाचे आरोग्य राखण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. Pubic hair योनीसाठी संरक्षक म्हणून काम करतात आणि विविध प्रकारचं इन्फेक्शन होण्यापासून रोखतात.
पावसाळ्यात आर्द्रता खूप जास्त असते. त्यामुळे योनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत Pubic hair काढणं योग्य ठरणार नाही. जर Pubic hair शेव्ह करायचे असतील तर ते वॅक्स करण्यापेक्षा ते ट्रिम करणं चांगलं.
पावसाळ्यात योनीच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून, तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल असे काहीही करू नका. चला तर मग जाणून घेऊया Pubic hair शेव्ह करणं तुमच्या योनीमार्गाच्या आरोग्यासाठी कसं धोकादायक ठरू शकतं.