किरण ताजणे, झी मीडिया, पुणे: राज्यातील विरोधी पक्षाला आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात रस नाही. आमचा भर हा कोरोना रोखण्यावर असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, कोरोनामुळे देशभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ४० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कोरोनाची राजधानी झाला आहे.
बापरे, देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या घरात
राज्य सरकारने अँटीजेन चाचण्या वाढवल्या असल्या तरी त्याचा फारसा उपयोग नाही. सरकारने संसर्ग रोखण्यावर (इन्फेक्शन रेश्यो) भर दिला पाहिजे. पुण्यात जम्बो रुग्णालयांऐवजी मध्यम आकाराची रुग्णालये उभारावीत. मुंबईतील जम्बो रुग्णालयांची परिस्थितीत फारशी चांगली म्हणावी, अशी नाही. त्याठिकाणी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोरोना टेस्टची संख्या वाढवल्याच्या सरकारी दाव्याची फडणवीसांकडून चिरफाड, म्हणाले...
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमणूक झाल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पक्षाने मला बिहार निवडणुकीत सहाय्य करण्यास सांगितले आहे. याचा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. महाराष्ट्र राज्य पोलिसांवर माझा विश्वास आहे. बिहार आणि मुंबई पोलिसांची तुलना होऊ शकत नाही. पोलिसांनी राजकीय दाडपणात काम करु नये. आम्ही कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.