Ravi Rana Excuslive : Devendra Fadnavis यांच्या भेटीत झालं काय? बच्चू कडू आणि राणा वादावर पडदा?

Bachchu kadu : दोघांचा वाद मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मध्यस्थी केलीय...आता रवी राणांनी माघार घेतलीय...पण, बच्चू कडू मंगळवारी (1 नोव्हेंबर 2022) काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 

Updated: Oct 31, 2022, 11:42 AM IST
Ravi Rana Excuslive : Devendra Fadnavis यांच्या भेटीत झालं काय? बच्चू कडू आणि राणा वादावर पडदा? title=
Ravi Rana Excuslive Reaction After devendra Fadnavis Meet girish mahajan Video nmp

Ravi Rana vs Bacchu Kadu : आता बातमी आहे कडू-राणा वादाची...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणांनी (MLA Ravi Rana) कडूंवर केलेलं वक्तव्य मागे घेतलं आहे. पण बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी अजून त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. दोघांचा वाद मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मध्यस्थी केलीय...आता रवी राणांनी माघार घेतलीय...पण, बच्चू कडू मंगळवारी (1 नोव्हेंबर 2022) काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 

'या' मंत्र्यामुळे झाली मध्यस्थी

बचू कडू अणि रवी राणा वादात मुख्य मध्यस्थीचं काम ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली, अशी राजकीय सूत्रांची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी आधी रात्री उशिरा वर्षा बंगलावर (meeting on cm varsha banglow) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यात बैठक झाली. याबैठकीत कडू आणि राणा यांच्यात समेट करण्याची काम महाजन यांच्याकडे दिलं होतं. महाजन यांनी कडू आणि राणा समवेत चर्चा करून नाराजी कमी करण्याचं काम केले तर दुसरीकडे सीएम डीसीएम यांनी दोन्ही नेत्याना कानपिचक्या देत दबाव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

बच्चू कडूंनी दिला होता इशारा (Maharashtra Politics)

रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. माझ्या अस्तित्वावर बोट ठेवाल तर बोटं छाटू असा थेट निर्वाणीचा इशाराच बच्चू कडूंनी दिला होता. राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे अन्यथा आपण मोठी घोषणा करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. (Ravi Rana Excuslive Reaction After devendra Fadnavis Meet girish mahajan Video nmp)

Ravi Rana Excuslive Video 

रवी राणांनी काय आरोप केला ? 

अमरावतीचे (Amravati) अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. दरम्यान कडूंनी 50 खोके घेतल्याबद्दलचं वक्तव्य मागे घेतो असं रवी राणांनी म्हटलंय...तर बच्चू कडूंनीही आक्षेपार्ह शब्द वापरलेत ते मागे घ्यावेत अशी अपेक्षा राणांनी व्यक्त केलीय.